मुख्य बातम्या

शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील एकजण एम पी डी ए (MPDA) कायद्यांतर्गत स्थानबध्द

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीतील सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय ३२) रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, जि.पुणे याला एम पी डी ए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्यात आले आहे. शिक्रापुर पोलीस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाचे अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर याला ताब्यात घेवुन सर्व कायदेशीर बाबींची पुर्तता करत त्यास पुणे येथील येरवडा मध्यवर्ती कारागृह येरवडा पुणे येथे रवाना करण्यात आले आहे.

पुणे शहराच्या लगत असणाऱ्या शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मोठया प्रमाणात औद्योगिकीकरण झालेले आहे. याच औद्योगिकरण क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती डोके वर काढुन काही लोक गैरमार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यासाठी दहशत निर्माण करुर गंभीर स्वरुपाचे गुन्हे करीत असतात. अशा प्रकारच्या गुन्हयांना वेळीच आळा घालुन त्यांच्यावर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी दिलेले आहेत.

 

त्याच अनुषंगाने शिक्रापुर पोलीस स्टेशनचे दिपरतन गायकवाड यांनी शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्यीतील गुन्हेगारांचा अभिलेख तपासुन नियमीत गुन्हे करणाऱ्या इसमांची यादी तयार केली. त्यामध्ये सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर (वय ३२) (रा. पिंपळे जगताप, ता. शिरुर, जि.पुणे) याच्यावर दुखापत, गंभीर दुखापत, खंडणी मागणे, खंडणीसाठी अपहरण करणे अशा प्रकारचे एकुण ४ गुन्हे दाखल असल्याचे दिपरतन गायकवाड यांच्या निदर्शनास आले.

 

वरील गुन्हयातील आरोपी सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर याच्या विरुध्द शिक्रापुर पोलीस स्टेशन येथुन एम पी डी ए कायद्यातंर्गत प्रस्ताव तयार करुन सदर प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांच्या मार्फत जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांच्याकडे सादर करण्यात आला होता. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी पुणे यांनी सदर प्रस्तावामधील व्यक्ती सागर उर्फ सचिन राजेंद्र कुसेकर यास ‘धोकादायक व्यक्ती’ या सदराखाली स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले.

 

सदरची कामगिरी हि पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक पंकज देशमुख, पुण्याचे अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, शिरुरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिक्रापुर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे यांच्यासह सहायक फौजदार जितेंद्र पानसरे, पोलिस हवालदार महेश बनकर, रामदास बाबर, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, विकास पाटील, रोहीदास पारखे, अतुल पखाले, शिवाजी चितारे, जयराज देवकर यांच्या पथकाने केली आहे.

शिरुरच्या बेट भागात हॉटेल मॅनेजरवर धारदार कोयत्याने जीवघेणा हल्ला; गुन्हा दाखल

शिरुर; खुनाचा प्रयत्न करुन पाच वर्षापासुन फरार असलेल्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

शिरुर तालुक्यात युवकाला कोयत्याने मारहाण करत जिवे मारण्याची धमकी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिवराज मोरे यांच्यावरील हल्ल्याची निष्पक्ष चौकशी करा; विजय वडेट्टीवारांची फडणवीसांकडे मागणी

नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…

5 तास ago

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

1 दिवस ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

1 दिवस ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

1 दिवस ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

1 दिवस ago