nimgaon-mahalungi-people
निमगाव म्हाळुंगीः डी. वाय 13 मायनार 7 या चासकमानच्या कालव्याची व पुलाची आणि कालव्या लगत असणाऱ्या डोंगराची तसेच डोंगरा वरील झाडांची कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेताच तोडफोड करण्यात आली आहे, याबाबत निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने चासकमानच्या अभियंत्यांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली आहे.
निमगाव म्हाळुंगीचे (ता. शिरूर) सरपंच बापूसाहेब काळे यांनी पत्रात म्हटले आहे की, निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) मध्ये शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न तसेच गावातील डोंगर आणि झाडांचे सपाटीकरण करून केली आहे. निसर्गाची हानी केल्यामुळे संबंधितावर कारवाई करावी.
डी. वाय 13 मायनार 7 या चासकमानच्या कालव्याची व पुलाची आणि कालव्या लगत असणाऱ्या डोंगराची तसेच डोंगरा वरील झाडांची कोणत्याही प्रकारची शासनाची परवानगी न घेताच तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे निमगाव म्हाळुंगी शेतकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण झाला आहे. त्यामुळे येथे पंधरा ते वीस दिवसांमध्ये पाण्याचे पाण्याचे आवर्तन सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सदर व्यक्तीने डोंगर आणि डोंगरावरील झाडांचे हि सपाटीकरण करून निसर्गाची हानी केली आहे. यामुळे निमगाव म्हाळुंगीचे वैभव कमी झाले आहे. यासाठी निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी सहाय्यक अभियंता श्रेणी 1, चासकमान कालवा उपविभाग क्रमांक चार व शाखा अधिकारी, चासकमान पाटबंधारे शाखा क्रमांक दोन शिक्रापूर या ठिकाणी संबधित व्यक्तीवर तक्रार दाखल करा, अशा आशयाचे पत्र देऊन लवकरात लवकर निमगाव म्हाळुंगी ग्रामस्थांना न्याय द्यावा हि विनंती निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांनी उपस्थित सर्व ग्रामस्थांच्या वतीने केली.
यावेळी दादा शिवले, म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे खजिनदार काळुराम चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, अतुल चव्हाण,अमोल काळे, सोमनाथ चव्हाण, राजेश चौधरी, सुनील काळे, लक्ष्मण लांडगे, अशोक रणसिंग, वैभव चव्हाण, गीताराम काळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
निमगाव म्हाळुंगी येथे दशक्रिया शेडच्या बांधकामाचे भूमिपूजन!
निमगाव म्हाळुंगीचे सरपंच बापूसाहेब काळे यांना सह्याद्रीरत्न पुरस्कार प्रदान!
निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!
निमगाव म्हाळुंगीमधील शेतकऱयांना मंत्रालयात मोठे संबंध असल्याचे सांगून धमकी…
निमगाव म्हाळुंगी येथे अंगणवाडी सेविकांनी अंगणवाडीची स्वच्छता करत केले वृक्षारोपण
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…
मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…
लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…