कारेगाव (तेजस फडके) येथे किरकोळ वादातुन एका व्यक्तीने बाजारात पायी चाललेल्या युवकाच्या पाठीमागुन कोयत्याने मारहान करत दुखापत केली. तसेच स्वतःचा जीव वाचविण्यासाठी तो युवक पळुन जाऊ लागल्याने त्याला कोयता फेकुन मारल्याची गंभीर घटना शनिवार (दि २९) रोजी घडली असुन याबाबत अक्षय रामदास शिवले याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनला फिर्याद दिल्याने निखिल रामचंद्र वीडगीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत रांजणगाव MIDC पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी अक्षय शिवले हा शनिवार (दि २९) रोजी बाभुळसर रस्त्यावर असलेल्या एका इमारती मधील चिकन शॉपच्या जवळुन आपल्या दोन मित्रांसह कारेगाव येथील बाजारात पायी जात असताना दुपारी झालेल्या वादाच्या कारणावरुन निखिल रामचंद्र वीडगीर यांने चिकन शॉपच्या दुकानातील कोयता घेऊन फिर्यादीच्या पाठीमागुन येऊन त्याच्या पाठीच्या डाव्या बाजुस मारुन दुखापत केली.
त्यावेळी फिर्यादी तिथुन पळुन जाऊ लागला. तेव्हा निखिल वीडगीर याने त्याच्या हातातील कोयता फिर्यादीच्या दिशेला फेकत शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे अक्षय रामदास शिवले (वय २६) सध्या (रा.बाभुळसर, आशापुरा बिल्डिंग समोर, ता.शिरुर, जि.पुणे) मूळ रा.निमगाव म्हाळुंगी, जिल्हा परिषद शाळेजवळ ता.शिरुर जि.पुणे याने रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे निखिल रामचंद्र वीडगीर याच्या विरोधात फिर्याद दिल्याने निखिल वीडगीर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार गणेश आगलावे या घटनेचा पुढील अधिक तपास करत आहेत.
MEPL कंपनीच्या पाण्यामुळे शेती नापीक झाल्याने त्रस्त झालेल्या शेतकऱ्याचा कुटुंबासह आत्मदहनाचा इशारा
शिरुर शहरात पोलिसांची दबंगगिरी; पाच पिस्तुलासह चार काडतुसे जप्त करत दोघांना ठोकल्या बेड्या
दिलीप वळसे पाटलांच्या बॅनरवरुन ४२ गावचं नेतृत्व करणाऱ्या प्रमुख नेत्याचा फोटो गायब; चर्चांना उधाण
प्रगतशील शेतकरी सुजाता थोरात यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार प्रदान!