मुख्य बातम्या

रांजणगाव गणपती येथे किरकोळ कारणावरुन मारहाण करुन डोक्याला गंभीर दुखापत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) दांडिया खेळताना किरकोळ कारणावरुन बचाबाची झाल्याने दोघांना फायटरने डोक्यात मारहाण करत गंभीर दुखापत केल्याप्रकरणी तीन जणांवर रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले असुन याबाबत अमोल बापु ढसाळ (वय 20) याने फिर्याद दाखल केली आहे.

रांजणगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार (दि 4) रोजी रात्री 10:30 च्या सुमारास रांजणगाव गणपती येथील काळुबाई मंदीर स्मशानभूमीजवळ नवरात्र उत्सवात दांडिया खेळताना फिर्यादी आणि आरोपी यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यामुळे यातील आरोपीनी फिर्यादी अमोल ढसाळ तसेच त्याचा मित्र अविनाश मोटे यांच्या डोक्यात टोकदार धारदार फायटरने जोरात मारत गंभीर दुखापत केली. त्यामुळे अमोल बापु ढसाळ रा रांजणगाव गणपती, नरवडे हॉस्पिटल जवळ ता.शिरुर जि.पुणे याने 1) संजीव बो-हाडे 2) प्रद्युत खुटेव व अन्य एकजण सर्व रा.रांजणगाव गणपती ता.शिरुर जि.पुणे यांच्या विरोधात रांजणगाव MIDC पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्याने पोलिसांनी वरील तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

रांजणगाव गणपती पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बलवंत मांडगे, उपनिरीक्षक विनोद शिंदे, निळकंठ तिडके यांनी तातडीने या घटनेचा तपास करत तीनपैकी संजीव बोऱ्हाडे आणि प्रद्युत खुटेव या दोन आरोपीना अटक करुन न्यायालयात हजर केले असता. न्यायालयाने त्यांना शुक्रवार (दि 7) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा पुढील तपास विनोद शिंदे करत आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

2 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

5 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

7 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago