मुख्य बातम्या

पिंपळे जगताप ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश; रस्त्याचे काम प्रत्यक्षात सुरु

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) पिंपळे जगताप (ता. शिरुर) येथील भारतगॅस कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था लक्षात घेऊन ग्रामस्थांनी केलेल्या आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. पुणे महानगर विकास प्राधिकरणाने संबंधित रस्त्याचे प्रत्यक्ष काम हाती घेतले असुन त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

ऑगस्ट २०२४ मध्ये उद्योजक श्रीपाद जगताप यांच्या नेतृत्वाखाली चक्री उपोषण छेडण्यात आले होते. या आंदोलनाला जातेगाव खुर्द, करंदी व सणसवाडी ग्रामपंचायत तसेच परिसरातील ग्रामस्थांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. त्यावेळी प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन निधी उपलब्ध करुन रस्त्याचे काम लवकर सुरु करण्याचे आश्वासन दिले होते. अखेर गेल्या दोन दिवसांपासून या कामाला सुरुवात झाली आहे. आय ओके महाविद्यालय ते भारतगॅस कारखाना या दरम्यान सिमेंट काँक्रिट रस्ता करण्यात येणार असुन यासाठी तब्बल पावणेदोन कोटी रुपयांचा निधी खर्च होणार आहे.

 

सध्या सुरु असलेल्या कामाची पाहणी उद्योजक श्रीपाद जगताप, बापू जगताप, सुभाष जगताप, शरद जगताप, शाम बेंडभर, शाहजी तांबे व सुरेश जगताप यांनी केली. खासदार डॉ अमोल कोल्हे, माजी आमदार अशोक पवार, आमदार ज्ञानेश्वर कटके व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले.

 

“या रस्त्यावरून अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने रस्ता अक्षरशः चाळण झाला होता. प्रशासनाने दीर्घकाळ दुर्लक्ष केल्याने आम्हाला आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागला. आज काम प्रत्यक्षात सुरू झाल्याने आम्ही समाधानी आहोत.”

श्रीपाद जगताप (आंदोलक) 

रांजणगाव MIDC उत्खनन प्रकरण; शिरुरच्या तहसीलदारांनी तक्रारदाराची फसवणुक केल्याचा आरोप…?

Video; रांजणगाव महागणपती चरणी मराठा आरक्षणासाठी प्रार्थना

Video; मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का…? रांजणगाव गणपतीत लागले फलक

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

21 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

21 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

21 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

1 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago