मुख्य बातम्या

शिरुर तालुक्यात अनेक लॉजवर वेश्या व्यवसाय जोमात; कारवाईची मागणी

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात नवरात्री उत्सवाच्या पार्श्वभुमीवर वेश्या व्यवसाय जोर धरत असल्याचे समोर आले आहे. या काळात गावोगाव आणि बाजारपेठांमध्ये महिलांसाठी विशेष कार्यक्रम तसेच धार्मिक समारंभ आयोजित केले जातात. मात्र, याचवेळी पुणे-नगर महामार्गावर असणाऱ्या काही गावात मुख्य चौकातील लॉजवर अनधिकृत वेश्या व्यवसाय चालत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिरुर तालुक्यात मोठया प्रमाणात सेक्स रॅकेटचे जाळे सक्रिय झाले असून काही रस्त्यांवर, सार्वजनिक ठिकाणी आणि खासगी हॉटेल्समध्ये अशा प्रकारचा गैरप्रकार चालत आहे. शिरुर, रांजणगाव आणि शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत सर्रास हा प्रकार चालु आहे. परंतु स्थानिक पोलीस प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.

हॉटेल आणि लॉजवर जोडप्यांची सिंगल एंट्री…?

शिरुर तालुक्यातील अनेक लॉजवर येणाऱ्या ग्राहकाची माहिती भरण्यासाठी रजिस्टर असते. मात्र हॉटेल किंवा लॉजवर येणाऱ्या जोडप्यांपैकी फक्त पुरुषांचीच या रजिस्टरवर नोंद केली जाते. तसेच अनेक लॉजवर शाळा किंवा कॉलेजच्या अल्पवयीन मुलींची नोंद केली जात नाही अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे.

अनधिकृत व्यवसाय करणाऱ्या लॉज मालकांवर कारवाई कधी…?

शिरुर तालुक्यात काही हॉटेल व लॉज मालक सगळ्या नोंदी अधिकृत ठेवतात. मात्र अनेकजण प्रेमी जोडप्यांपैकी फक्त पुरुषांचीच नोंद ठेवतात. त्यामुळे गैरप्रकार वाढतं आहेत अशा हॉटेल व लॉजच्या रजिस्टरची तपासणी करुन त्यांच्यावर कडक कारवाई करणे गरजेचे असताना पोलिस प्रशासन मात्र बघ्याची भुमिका का…? घेत आहे अशी सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

शिरुर उपविभागीय कार्यालय नावापुरतेच…?

शिरुर तालुक्यातील शिरुर, रांजणगाव आणि शिक्रापुर या तीन पोलिस स्टेशनच्या हद्दीत कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात आली असुन चोऱ्या, दरोडे तसेच अवैध धंद्याना ऊत आला आहे. परंतु पोलिस स्टेशनच्या वसुली बहाद्दर मात्र ‘महसूल’ गोळा करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे शिरुर उपविभागीय कार्यालय फक्त नावापुरतेच आहे कां…? असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचारत आहे.

शिरुर तालुक्यात जर कुठेही असे बेकायदेशीर व्यवसाय चालत असतील. तर त्यांची माहिती संबंधित पोलिस स्टेशन किंवा थेट उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालयात द्यावी. तक्रारदाराचे नाव गोपनीय ठेवले जाईल.

प्रशांत ढोले

उपविभागीय पोलिस अधिकारी 

शिरुर

शिरुर तालुक्यात कंटेनर चोरी; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Video; शिरुरमध्ये अमोल ज्वेलर्सवर दरोडा; लाखो रुपयांचा ऐवज लंपास

Video; मुसळधार पाऊसात विजेच्या खांबावर लटकावला बॅनर, महावितरण कारवाई करणार का…?

शिरूर तालुका टीम

Recent Posts

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

1 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

3 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

1 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

2 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

2 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

2 दिवस ago