मुख्य बातम्या

काय ते देवस्थान, काय त्यांचा कारभार, सगळं कसं अजबच हाय…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): पुणे-नगर महामार्गावरील महागणपती मंदिरासमोर बुधवारी (ता. ६) रोजी सकाळी ११ च्या सुमारास गोरक्ष शंकर भुजबळ या व्यक्तीचा अपघात झाला. हाकेच्या अंतरावर रांजणगाव देवस्थानची ट्रस्टची अँब्युलन्स उभी असताना ती वेळेवर उपलब्ध न झाल्याने सदर अपघातग्रस्त व्यक्तीला खाजगी वाहनातून उपचारासाठी दवाखान्यात न्यावे लागले. परंतु, रस्त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. देवस्थान ट्रस्टची अँब्युलन्स कदाचित वेळेवर मिळाली असती तर या व्यक्तीचा जीव वाचला असता, अशी खंत भाजप विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष हर्षद जाधव यांनी व्यक्त केली.

पुणे-अहमदनगर महामार्गावर रांजणगाव गणपती हे अष्टविनायक मधील महत्वाचे देवस्थान आहे. महागणपतीचे मंदिर रस्त्याच्या लगतच असल्याने या ठिकाणी सतत भाविकांची वर्दळ असते. तसेच महागणपती मंदिरासमोर पुण्याकडुन-अहमदनगरकडे जाताना चढ तर अहमदनगर कडून पुण्याकडे जाताना उताराचा रस्ता असल्याने हा रस्ता ओलांडत असताना यापुर्वीही अनेकवेळा येथे गंभीर स्वरुपाचे अपघात झालेले आहेत. परंतु, फक्त अँब्युलन्स वेळेवर न मिळाल्याने अनेकांचा उपचारा अभावी मृत्यू झालेला आहे.

रांजणगावमध्ये टँकरच्या धडकेत एकाचा मृत्यू; तर एक जखमी…

रांजणगाव गणपती येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात अँब्युलन्स आहे. परंतु अनेकवेळा अपघात झाल्यानंतर 112 नंबर ला फोन करुन अँब्युलन्स येईपर्यंत 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो. त्यामुळे स्थानिक ग्रामस्थ देवस्थानला फोन करुन अँब्युलन्सची मागणी करतात. परंतु, मंदिरात असलेली अँब्युलन्स ड्रायव्हर नाही. पंक्चर आहे, नादुरुस्त आहे अशी विविध कारणे देत ग्रामस्थांना उपलब्ध होत नसल्याचा ग्रामस्थांना आजपर्यंतचा अनुभव आहे.

देवस्थानचा अजब कारभार…?
रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टकडे पुर्वी एक मोठी आणि एक छोटी अशा दोन अँब्युलन्स उपलब्ध होत्या. परंतु त्यातील मोठी अँब्युलन्स ट्रस्टने विकून टाकली. याबाबत ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर यांना विचारले असता ते म्हणाले, ‘एक अँब्युलन्स खुपच जुनी झाली होती म्हणून आम्ही ती विकून टाकली. परंतु, जाणकारांच्या माहितीनुसार ती अँब्युलन्स नवीनच खरेदी केली होती आणि तिला खरेदी करुन फक्त 6 ते 7 वर्षच झाले होते. त्यामुळे देवस्थान ट्रस्टने मोठी अँब्युलन्स नक्की का विकली…? असा प्रश्न निर्माण होत आहे. तसेच बुधवारी अपघात झाला तेव्हा हर्षद जाधव यांनी स्वतः देवस्थानचे अध्यक्ष दरेकर यांना फोन केला होता. परंतु तो त्यांनी उचलला नाही असे जाधव यांनी सांगितले.

रांजणगाव गणपती ट्रस्टचे अध्यक्ष विजयराज दरेकर म्हणाले, ‘बुधवारी अपघात झाल्यानंतर मला जाधव यांचा फोन आला नव्हता. तसेच ट्रस्टच्या अँब्युलन्सचा तांत्रिक बिघाड झाल्याने ती वेळेवर उपलब्ध होऊ शकली नाही. रांजणगाव तसेच आसपासच्या परिसरात अपघात झाल्यास आम्हाला स्थानिक पोलिस स्टेशनमधुन फोन आल्यानंतर कायमच आम्ही अँब्युलन्स उपलब्ध करुन देत असतो. परंतु, हर्षद जाधव आणि रांजणगाव देवस्थानच्या कर्मचाऱ्याच्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल झाल असून त्यात जाधव यांनी देवस्थानच्या कारभाराविषयी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे.’

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

11 मिनिटे ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

15 मिनिटे ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

18 मिनिटे ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

22 मिनिटे ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

4 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

5 तास ago