मुख्य बातम्या

शिंदोडी येथे बिबट्यासाठी वनविभागाने लावला पिंजरा

शिरुर (तेजस फडके ) शिरुर तालुक्याच्या पुर्वभागातील शिंदोडी येथे गेल्या महिनाभरापासुन बिबट्याने अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या, कोंबड्या तसेच कुत्री यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार केले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ प्रचंड दहशतीत असुन दिवसा शेतात जायला शेतकरी घाबरत आहेत. बिबट्याच्या दहशतीने रात्रीच्या वेळेस घराबाहेर पडण्यास ग्रामस्थ धाडस करत नसुन शिंदोडी मध्ये ऊस मोठया प्रमाणात असल्याने बिबट्याला लपण्यासाठी जागा मिळत आहे. काही नागरिकांना बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शनही झाले आहे.

ranjangaon-mutadwar-darshan

त्यामुळे शिंदोडी येथे पिंजरा लावावा अशी मागणी शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालुकाध्यक्ष योगेश ओव्हाळ यांनी शिरुर येथील वनविभागाचे वन परीक्षेत्र अधिकारी मनोहर म्हसेकर यांना संपर्क साधुन केली होती. त्यावेळी म्हसेकर यांनी तीन दिवसात गावात पिंजरा उपलब्ध करुन देऊ असे आश्वासन ओव्हाळ यांना दिले होते. त्यानुसार आज रविवार (दि 4) रोजी वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर शहरात गोळीबार करणाऱ्या तिघांना DB पथकाने सुपा टोलनाक्यावर सापळा लावत ४८ तासांत घेतलं ताब्यात

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील लाटेआळी-आंबेडकरनगर परिसरात शुक्रवारी (१८) सकाळी साडे-सहाच्या सुमारास झालेल्या गोळीबारात हरिष…

1 तास ago

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

19 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

22 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

24 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago