कारेगाव (तेजस फडके) शिंदोडी सारख्या गावातून शेतकरी कटुंबातून आलेल्या शिवलिंग वांगणे यांनी कारेगाव येथे अतिशय प्रतिकुल परिस्थितीत यांनी हॉटेल व्यवसायात जम बसवला असुन त्यांनी केलेली प्रगती उत्तम असल्याचे मत पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले.
कारेगाव येथील गजबजलेल्या यश इन चौकात शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते हॉटेल जगदंबचं उदघाट्न करण्यात आलं. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन निलेश लंके तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणुन अशोक पवार उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार अशोक पवार म्हणाले, आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव एमआयडीसी मध्ये नोकरीवर अवलंबून न राहता शिवलिंग वांगणे यांनी व्यवसायाची वेगळी वाट निवडली हे कौतुकास्पद असुन हॉटेल व्यवसायात त्यांनी उत्तरोत्तर प्रगती करावी. तसेच या हॉटेलच्या आणखीन शाखा वाढवाव्यात.
यावेळी बोलताना शिरुर तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष रविंद्र काळे म्हणाले, तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायात पाऊल टाकले पाहिजे. व्यवसायात अनेक संधी उपलब्ध असुन त्या शोधून त्याचा फायदा घेतला पाहिजे.
जिल्हा परीषद सदस्य राजेंद्र जगदाळे म्हणाले, शिवलिंग वांगणे आणि मी कराटे शिकायला एकत्र होतो. कराटे शिकल्यानंतर त्यांनी काही दिवस कराटे क्लास घेतले आणि त्यानंतर हॉटेल व्यवसायात पदार्पण केल याचा मनस्वी आनंद आहे.
यावेळी जनता दल सेक्युलरचे राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे, शिरुर पंचायत समितीचे माजी सभापती विश्वास कोहकडे, उद्योजक सुनील ओस्तवाल, कारेगावचे उपसरपंच संदीप नवले, ग्रामपंचायत सदस्य शहाजी तळेकर, माजी ग्रामपंचायत सदस्य राहुल गवारे, ह भ प राहुल महाराज राऊत, शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे अध्यक्ष एकनाथ वाळुंज, संचालक विठ्ठल दुर्गे, शिवसेना शेतकरी सेनेचे माजी तालूकाध्यक्ष योगेश ओव्हाळ, शिदोडीचे सरपंच अरुण खेडकर, ग्रा पं सदस्य गौतम गायकवाड, भगवंत वाळुंज सर, रामकृष्ण गायकवाड, मछिंद्र खैरनार, पत्रकार पोपट पाचंगे, नवनाथ खोपडे आदी मान्यवर उपस्थित होते.
खासदार रवींद्र वायकर यांच्या बैठकीत २७ प्रलंबित प्रकल्पांचा आढावा; भगतसिंग नगरमधील विकासकावर निष्कासनाची कारवाई मुंबई…
ॲस्ट्राझेनेकाच्या मुंबईतील जागतिक दर्जाच्या मुख्यालयाचे उद्घाटन; दर्जेदार आणि किफायतशीर आरोग्यसेवेवर भर मुंबई: औषधनिर्मिती क्षेत्रात संशोधन आणि…
शिरूर (तेजस फडके) : शिरुर शहरातील आनंद सोसायटीत पहाटेच्या सुमारास सशस्त्र चोरट्याने धुमाकूळ घालत गोळीबार…
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…