मुख्य बातम्या

शिरुर; शेतकऱ्यांना वन विभागाकडून सोलर झटका मशीनचे वाटप

शिरुर (अरुणकुमार मोटे) मानव आणि बिबट यांचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालेला दिसुन येत आहे. कवठे येमाई, सविंदणे ‌या परिसरात बिबट‌ व तत्सम जंगली हिंस्र प्राण्यांचे ‌प्रमाण वाढले आहे. शेतकरी आपले पशुधन टिकवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आहेत. तसेच या गावातील शेत पिकाचे वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

 

त्यामुळे पशुधनाचे व शेत पिकाचे ‌वन्य प्राण्यांकडून मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने गावातील काही शेतकऱ्यांना वन्य प्राण्यांकडुन‌ पशुधनाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी‌ पशुधनाच्या बंदिस्त गोठ्याला संरक्षण मिळुन बिबट आत मध्ये प्रवेश करु नये म्हणून वन विभागाकडून ‌ सविंदणे व कवठे या गावातील भानुदास कांदळकर (कवठे येमाई), संजय नाथू पडवळ (सविंदणे) सखाराम मारुती सरोदे (कवठे येमाई), चंद्रकांत पंढरीनाथ पडवळ (सविंदणे) दिलीप कोंडीबा मुंजाळ (कवठेयेमाई) या शेतकऱ्यांना‌ झटका मशीनचे वाटप करण्यात आले.‌ ‌‌ या सोलर झटका मशीन मुळे गोठ्यातील पशुधनांचे संरक्षण होणार असून ‌ शेतकऱ्यांना आपले पशुधन वाचविण्यास मदत होणार आहे.

 

वनपरिक्षेत्र वनअधिकारी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल गणेश पवार, वनरक्षक नारायण राठोड, वनमजूर हनुमंत कारकूड यांच्या उपस्थितीत हे वाटप करण्यात आले.

 

सोलर झटका मशीन मधील सोलर फेन्सिंग मुळे वन्य प्राण्यांकडून होणारे पशुधनाचे नुकसान मोठ्या प्रमाणात कमी होते. गोठ्याच्या कुंपणावर हे मशीन लावल्यास पाळीव पशुधनाला संरक्षण मिळते. या मशीनची किंमत साधारणता ३० हजार रुपये असते परंतु वन विभागाकडून ते ७५०० एवढ्या किंमतीत ‌ शेतकऱ्यांना अनुदानावर दिले जाते.

गणेश पवार 

वनपाल 

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी

कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर तालुक्यातील ‘या’ गावात भुजल पातळी खाली गेल्याने बोअरवेल घेण्यास बंदी

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

घोड धरणात प्रशासनाच्या नाकावर टिच्चून सर्रास बेकायदेशीर वाळूउपसा; घोड पाटबंधारे, महसूल अन् पोलिस प्रशासन वाळू माफियांसमोर हतबल…?

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या परिसरात दिवसाढवळ्या बेकायदेशीर वाळूउपशाचा धडाका सुरुच असुन घोड धरणाच्या सुरक्षेचा…

9 तास ago

रांजणगावात जुन्या भांडणातून तरुणावर हल्ला; कोयता, दगड, फायटरने मारहाण

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत जुन्या भांडणाच्या कारणावरुन एका १९ वर्षीय तरुणासह…

12 तास ago

Video! शिरूरमध्ये झालेल्या गोळीबारातील हरिश गंगावणे याच्या खुनाची Inside Story…

शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात शुक्रवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास गोळीबाराची धक्कादायक घटना घडल्याने परिसरात…

14 तास ago

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

2 दिवस ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

3 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

3 दिवस ago