मुख्य बातम्या

शिरुर-हवेली मतदार संघात कंद यांच्या निर्धार मेळाव्यात दिवाळीपुर्वीचं फटाके फुटण्याची शक्यता…?

शिरुर (तेजस फडके): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर सध्या शिरुर-हवेली मतदार संघात ऐन थंडीतही राजकीय वातावरण गरम झाले असून, विधानसभेसाठी भाजपाकडून प्रदीप कंद इच्छुक होते. तसेच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर ऊर्फ माऊली कटके हे सुद्धा विधानसभेसाठी इच्छुक होते. कटके यांनी ऐनवेळी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षात प्रवेश केला. त्यामुळे कंद यांचे समर्थक नाराज झाले असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे.

प्रदीप कंद यांनी रविवारी (ता. २७) पेरणे फाटा (ता.हवेली) येथे निर्धार मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात दिवाळीपूर्वीच राजकीय फटाके फुटण्याची शक्यता आहे. या निर्धार मेळाव्यात राजकीय आरोप-प्रत्यारोप होऊ शकतात, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. माऊली कटके यांनी आयत्या वेळेस महायुतीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने प्रदीप कंद यांची गोची झाली आहे.

काही दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी एक बैठक घेत विधानसभा निवडणुकीसाठी कोणताही उमेदवार आयात करु नये. त्यापेक्षा आमच्यातील कोणालाही उमेदवारी द्यावी, अशा आशयाचे पत्र अजित पवार यांना दिले होते. परंतु, तरीही माऊली कटके यांचा पक्ष प्रवेश झाल्यानंतर त्यांना महायुतीकडुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती होणार….?
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आधी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. परंतु, लोकसभेला शिरुरचा मतदार संघ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाला सुटल्यानंतर आढळराव पाटील यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची साथ सोडत अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत लोकसभेची निवडणुक लढवली. परंतु शिरुर लोकसभा मतदार संघातील स्वाभिमानी मतदारांना हि गोष्ट न पटल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना भरघोस मतांनी निवडुन दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी उद्धव ठाकरेंची साथ सोडून अजित पवार गटात गेलेल्या माऊली कटके यांना डावलून शिरुर-हवेलीची स्वाभिमानी जनता संघर्षाच्या काळात शरद पवारांसोबत ठामपणे उभ्या राहणाऱ्या अशोक पवार यांना साथ देऊन लोकसभेची पुनरावृत्ती करुन इतिहास घडविणार का हे येत्या २३ नोव्हेंबर रोजी कळणार आहे.

महायुतीला अखेर मुहूर्त मिळाला… अशोक पवारांच्या विरोधात माऊली कटके

ठाकरे गटाचे पुणे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर कटके यांचा राष्ट्रवादीत प्रवेश; शिरूर-हवेलीत रंगणार सामना…

शिरुर तालुक्यातील दोन नेते महायुतीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत; पाहा नावे…

शिरूर विधानसभा मतदारसंघासाठी अशोक पवार यांनी भरला उमेदवारी अर्ज…

शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी…

विधानसभा मतचाचणी! आंबेगाव-शिरूर; शिरूर-हवेली मतदार संघामधून पसंती कोणाला?

Loading ...
शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई बनेल जगाची फिनटेक राजधानी; एजंटिक AI आणि क्वांटम तंत्रज्ञानातून महाराष्ट्रात वित्तीय क्रांती

मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचे ढोल-ताशांच्या गजरात जंगी स्वागत; ब्रिटिश संसदेत होणार सन्मान

लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…

6 तास ago

शेतकरी संकटात, सरकार मात्र शक्तिपीठाच्या विषयात; वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल

नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…

6 तास ago

लंडनमध्ये एकनाथ शिंदेंचा डंका! ब्रिटिश संसदेत तीन पुरस्कारांनी होणार गौरव

मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…

6 तास ago

गरब्यात मुस्लिमांच्या प्रवेशावरून वाद; अमृता फडणवीसांच्या भूमिकेचे संजय राऊतांकडून समर्थन

तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…

12 तास ago

वाघाळे येथील मारुती थोरात (गुरुजी) यांचे अपघाती निधन…

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…

12 तास ago