शिरुर (तेजस फडके) शिरुर-हवेलीतील महायुतीचा तिढा अखेर सुटला असुन राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडुन माऊली ऊर्फ ज्ञानेश्वर कटके यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे शिरुर-हवेली मतदार संघात आता साहेबांची राष्ट्रवादी विरुद्ध दादांची राष्ट्रवादी अशी चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे.
माऊली कटके यांनी नुकताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातुन अजित पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये प्रवेश केला आहे. शिरुर-हवेली मतदार संघात भाजपा कडुन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रदीप कंद हे सुद्धा उमेदवारीसाठी इच्छुक होते. परंतु महायुतीच्या वतीने अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाला शिरुर-हवेली मतदार संघात जागा देण्यात आली.
लोकसभा निवडणुकीच्या वेळेस न्हावरे येथील प्रचार सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेतल्या भाषणात अशोक पवार यांना ‘तु आमदार कसा होतो’ असा दम दिला होता. त्यामुळे अजित पवार हे अशोक पवार यांना पराभुत करण्यासाठी कोणता तुल्यबळ उमेदवार देणार याकडे शिरुर-हवेलीकरांच लक्ष लागलं होते.
अशोक पवार यांचा पराभव करण्यासाठी अजित पवार हे शिरुर-हवेली मतदार संघातून उमेदवारी अर्ज भरणार अशा वावड्या उठवल्या जात होत्या. परंतु या मतदार संघात माऊली कटके तसेच प्रदीप कंद हे दोघेही इच्छुक होते. त्यामुळे गेले अनेक दिवस उमेदवारीचा तिढा सुटत नव्हता. शेवटी माऊली कटके यांना उमेदवारी मिळाल्याने हा तिढा सुटला आहे.
शिरुर-आंबेगाव मतदार संघातील बारा गावच्या पाणीप्रश्नामुळे वळसे पाटलांवर शेतकरी नाराज…?
दिलीप वळसे-पाटील यांना पाठिंबा देण्यावरून पत्रकार परिषदेत जोरदार राडा
शिरूर! देवदत्त निकम यांच्यासाठी काही गावात फुलांच्या पायघड्या आणि ज्येष्ठांकडून लोकवर्गणी
पवार साहेबांनी आमदार तसेच मंत्रीपद देऊनही संघर्षाच्या काळात त्यांनी साहेबांना सोडल; देवदत्त निकम