मुख्य बातम्या

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

जुन्नर : शिरूर लोकसभेच्या निवडणुकीत अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील अशी लढत बघायला मिळणार आहे. ही लढत अजित पवार यांच्यासाठी प्रतिष्ठेची असणार आहे. याच दरम्यान अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव पाटील यांची शिवनेरी गडावर भेट घडली. आढळराव समोर येताच कोल्हे यांनी हस्तांदोलन केले आणि आढळरावांच्या पाया पडले आणि आशीर्वाद ही घेतला. दोघांनी शिरूर लोकसभेसाठी एकमेकांना शुभेच्छा ही दिल्या. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आज (गुरुवार) सकाळच्या सुमारास दोघेही शिवनेरी गडावर शिवरायांच्या चरणी लीन होण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी गेले होते. यावेळी दोघांची रस्त्यात भेट झाली. दोघांचे कार्यकर्ते आणि गडावरील लोक उपस्थित होते. आढळराव पाटील समोर येताच अमोल कोल्हेंनी थेट वाकून आढळराव पाटील यांना नमस्कार केला. त्यानंतर दोघांमध्ये हसत गप्पा झाल्या आणि हस्तांदोलन करुन दोघेही मार्गस्त झाले. मात्र, या कृत्यातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन झाले.

अमोल कोल्हे म्हणाले, ‘दिल्लीच्या तख्तासमोर न झुकण्याची प्रेरणा किल्ले शिवनेरीवर मिळते. वयस्कर व्यक्तीला वाकून नमस्कार करणे ही संस्कृती आहे म्हणून की आढळराव पाटील यांना नमस्कार केला, ही संस्कृती जपली पाहिजे आणि लढण्यासाठी ताकद द्या, सर्वसामान्य नागरिकांसाठी लढण्याची प्रेरणा द्या, हेच आज शिवनेरीवर नतमस्तक होताना मागणं मागितले.

दरम्यान, शिरुर लोकसभा मतदारसंघाची मागील काही दिवसांपासून मोठी चर्चा रंगली. आढळराव पाटील यांनी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यांच्याविरोधात उभे असलेले अमोल कोल्हे निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अमोल कोल्हे विरुद्ध आढळराव पाटील असा तगडा सामना पाहायला मिळणार आहे. अमोल कोल्हे यांना पाडणार म्हणजे पाडणार, असा निर्धार अजित पवार यांनी घेतला आहे. त्यामुळे या मतदार संघात अजित पवारांना मोठा कस लावावा लागणार आहे. दोघे एकमेकांवर मागील काही दिवसांपासून टीका टिपण्णी करताना दिसत आहे. त्यात अजित पवार यांनीदेखील लक्ष घातले आहे. त्यामुळे येत्या काळात शिरुर मतदारसंघातील जनता नेत्याला निवडून देतात की अभिनेत्याला निवडून देतात, हे पाहणे महत्वाचे असणार आहे.

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आढळरावांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, शिवसैनिक त्यांना माफ करणार नाही; सचिन अहिर

वाघोली (प्रतिनिधी) शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मजबूत असुन या दोन्ही तालुक्यात…

2 दिवस ago

इंडिया आघाडी अतिरेक्यांची भाषा बोलू लागली; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी शिरुर येथे मंगळवार…

2 दिवस ago

Video; गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवताय, पाबळच्या युवकाने आढळराव यांना पाणी प्रश्नावर घेरलं…

शिरुर (तेजस फडके) 'गेले दहा वर्ष तुम्ही आम्हाला फसवत आहात. तुम्ही १५ वर्षे खासदार असताना…

2 दिवस ago

शिरुर ग्रामीण मध्ये डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी कार्यकर्ते मैदानात

शिरुर (तेजस फडके) शिरुर लोकसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ शिरुर…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन…

3 दिवस ago

शिरुर तालुक्यात एका व्यक्तीस आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी नऊ जणांविरोधात गुन्हा दाखल

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिरुर तालुक्यातील निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी संतोष सुभाष चौधरी यांनी विषारी औषध…

4 दिवस ago