Shivajirao Adhalrao Patil

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : मी अजित पवार यांच्या सोबत जातोय या चर्चांना अजून वेळ आहे, जागावाटप झाल्यावर ठरवू असे, शिरुर मतदारसंघातील शिंदे गटाचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. जागा वाटपात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला शिरूरची जागा आली तर आढळराव पाटील हे अजित पवार यांच्या सोबत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदे गटाची धाकधूक वाढल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

खासदार डॉ. अमोल कोल्हे हे शरद पवार गटामध्ये असल्याने त्यांचा पराभव करणार म्हणजे करणार असे आव्हान अजित पवार यांनी दिले आहे. या ठिकाणचा खासदार आपण निवडून आणणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते. त्यानंतर आढळराव पाटील काय करणार? याची चर्चा सुरू झाली होती.

अजित पवार यांच्या वक्तव्यावर बोलताना आढळराव पाटील म्हणाले की, ‘महायुतीतील तिन्ही पक्ष मिळून शिरूर लोकसभेचा उमेदवार कोण हे ठरवतील. मात्र मी अजून एकदा ही बोललो नाही की मी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जातोय. जागांचं वाटप झाल्यावर ठरवू.’

दरम्यान, अमोल कोल्हे यांना या निवडणुकीत पाडणार म्हणजे पाडणारच असा निश्चय अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार म्हणाले की, ‘एका खासदाराने आपल्या मतदारसंघात लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही जिवाचं रान केलं. आता त्यांचं चाललंय सगळं. पण मधल्या काळात मतदारसंघात लक्ष नव्हतं, ते मतदारसंघात फिरत नव्हते, त्यांनी पूर्णपणे मला आणि त्यावेळचे माझे जे वरिष्ठ आहेत, त्यांनाही सांगितलेलं मी राजीनामा देतोय. मी एक कलावंत आहे, माझ्या सिनेमावर परिणाम होऊ लागला आहे, मी काढलेला एक सिनेमा शिवरायांवर असला तरी तो चालला नाही. माझ्या एकंदरीत प्रपंचावर, आर्थिक गोष्टींवर परिणाम होतोय, अशा गोष्टी त्यांनी येऊन सांगितल्या.’

अजित पवार पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात; म्हणाले…

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील