ajit-pawar-amol-kolhe

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : शिरूर लोकसभा निवडणूकीत होणार काटे की टक्कर होणार असून, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उतरण्याची शक्यात आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. राजकीय बदलांमुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच अजित पवार गटात दाखल होतील आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित दादा गटाकडून पुन्हा शिरूर लोकसभेच्या घाटात उभे ठाकतील, अशीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजी आढळराव पाटलांनी 2004 साली आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्मितीनंतर 2009-2014 असे सलग दोन लोकसभा निवडणूका जिंकल्या होत्या. 2019 ला चौकार मारणार अशीच परिस्थिती होती. पण, राष्ट्रवादीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी विजय मिळविला होता. राज्यातील सत्तासंघर्षांत पक्ष विभागले गेले. अमोल कोल्हे यांनी ‘शेतकरी आक्रोश मोर्चा’ काढून, महायुती सरकारच्या मनसुब्यात ‘काटे’ टाकले. त्यामुळेच संतापलेल्या अजित पवार यांनी अमोल कोल्हेंची घोडेस्वारी रोखण्याचा चंग बांधला आहे. आगामी लोकसभेच्या घाटात कोल्हे यांनी पुन्हा बारी मारूनच दाखवावी, असे खुलं आव्हान अजित पवार यांनी दिले आहे.

अजित पवार यांच्याकडे अमोल कोल्हे यांच्या तुलनेत तुल्यबळ उमेदवार तूर्तास तरी नक्कीच नाही. पण, दोन पर्याय दिसून येतात. एकतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आणि सलग तीन वेळा खासदारकीचा अनुभव असणाऱ्या आढळराव यांना ते स्वतःकडे खेचू शकतात, अथवा पूर्वाश्रमीचे त्यांचे अन् सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार पैलवान महेश लांडगे यांना स्वगृही परतण्याचे ते आमंत्रण धाडू शकतात.

लोकसभा निवडणूक : 2019 चे निकाल
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे , राष्ट्रवादी काँग्रेस : 6 लाख 35 हजार 830 (विजयी)
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना : 5 लाख 77 हजार 347

लोकसभा निवडणूक : 2014 चे निकाल
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना : 6 लाख 42 हजार 828 (विजयी)
देवदत्त निकम, राष्ट्रवादी : 3 लाख 41 हजार 375

लोकसभा निवडणूक : 2009 चे निकाल
शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना : 4 लाख 82 हजार 563 (विजयी)
विलास लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस : 3 लाख 3 हजार 952

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराची राष्ट्रवादीकडून घोषणा…

शिरुर लोकसभा मतदारसंघावर शिवसेना ठाकरे गटाचा दावा…