ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

मुख्य बातम्या राजकीय

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात जाऊन कामांची पाहणी केली. दुसरीकडे अमोल कोल्हे शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांचे आभार मानले आहेत.

अजित पवार यांनी शिरूर मतदारसंघात येणाऱ्या हडपसरमध्ये जात विकासकामांची पाहणी केली. त्यावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ‘अजितदादांनी शिरूर मतदार संघात जो दौरा केला. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. मांजरीमधील उड्डाणपूल आणि पाणीपुरवठा योजनांची त्यांनी पाहणी केली, त्यांचे मनापासून आभार. मी सिझन राजकारणी नाही, माझ्या शिक्षण संस्था नाही. अजितदादांनी आता भूमिका बदलली. मी मात्र भूमिका बदलली नाही. काही खाजगी गोष्टी विश्वासाने सांगितल्या जातात. याबाबत अलिखित संकेत असतो. मात्र, अशा गोष्टी मांडायच्या असतील तर सगळ्याच मांडाव्या लागतील. सर्वसामन्यांपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मी बोलतोय आणि यात्रा काढतोय त्यात गैर काय? कोविड काळात प्रश्न कोण मांडत होते? इंद्रायणी मेडीसिटी प्रकल्प कोणी मांडला? पदयात्रा काढत असताना तुम्हाला हसू येते?. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर हसू येते. हे शेतकऱ्याची बाजू का नाही घेत? असा सवालही अमोल कोल्हे यांनी केला.

अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिल्यानंतर शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटाच्या मार्गावर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. यावर अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अपेक्षा करणं काही गैर नाही. मात्र या गोष्टी माझ्यासाठी आता महत्वाच्या नाहीत. महायुतीमध्ये कोणंती जागा कोणाला जाणार या अनेक गोष्टी बाकी आहेत. यावर आता भाष्य करणं योग्य नाही. पाण्यात म्हैस आणि बाजारात मोल अशी गोष्ट मी करत नाही, असे अमोल कोल्हे म्हणाले.

शेतकरी मोर्चावर बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, ‘शेतकऱ्यांच्या मागणीसाठी शेतकरी आक्रोश मोर्चा काढत आहोत. पुणे जिल्ह्यात 3 दिवस हा मोर्चा होणार आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालय समोर सांगता होणार आहे. शेतकऱ्यांविषयाची संसदेत सरकार आम्हाला बोलू देत नसेल. तर रस्तावर उतरून शेतकऱ्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आमचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा. हीच आमची मागणी आहे.’

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अजित पवार पहाटेच अमोल कोल्हे यांच्या मतदारसंघात; म्हणाले…

अमोल कोल्हे यांच्या विरुद्ध शिरुरमधून अजितदादांकडून तगडा उमेदवार तयार…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

Video: स्वतःच्या वयाचा मान राखून बोला, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा इशारा