मुख्य बातम्या

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत झाला आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.

शिरुर मतदार संघात महायुती सध्या कोण उमेदवार देणार याची चांगलीच चर्चा रंगली. मात्र त्यानंतर वर्षा बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर आज आढळराव पाटील यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. पत्रकार परिषदेत बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘शिरूर लोकसभा मतदार संघ गेली आठवडाभर चर्चेत आहे. आढळराव हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत जाणार, प्रदीप कंद राष्ट्रवादीत जाणार, अगदी पार्थ पवार येथून निवडणूक लढवणार, या चर्चेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. म्हणून मुख्यमंत्र्यांना मी काल पुन्हा भेटलो. ते म्हणाले अद्याप जागांचे वाटप झालेले नाही. मात्र अजित पवार म्हणाले त्यांचे आमदार जास्त आहेत, त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावर हक्क गाजवला आहे. असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मला म्हणाले. त्यामुळं ही जागा राष्ट्रवादीकडे जाऊ शकते. त्या अनुषंगाने मला जर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढवण्याबाबत मला विचारणा झाली तर काय करायचं? याबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाली. कार्यकर्ते ही म्हणतायेत, की राष्ट्रवादीला जागा सुटली तर आपण घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवू. पण शेवटचा आदेश हा मुख्यमंत्र्यांचा आहे.’

शिरुर लोकसभेतील विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांना पराभूत करण्याचे खुले आव्हान अजित पवार यांनी दिले आणि त्याच दिवसापासून या मतदार संघात मोठ्या घडामोडी घडू लागल्या. महायुतीत याच मतदार संघासाठीट रस्सीखेच सुरु आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राष्ट्रवादी असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दोन दिवसांनी याच अनुषंगाने वर्षा बंगल्यावर महत्वपूर्ण बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि याच मतदार संघातील महत्वाचे नाव म्हणजे दिलीप वळसे पाटील यांच्यात याच मतदार संघावरुन खलबतं झाली आणि अजित पवार यांनी या ठिकाणी दबावाचे राजकारण केल्याचे बोललं जात आहे. आता कार्यकर्त्यांनीदेखील आणि आढळराव यांनी निवडणूक लढवण्याचा चंग बांधल्याचं दिसून येत आहे. पुढील काही दिवसात चित्र स्पष्ट होईल.

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

1 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

1 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

1 दिवस ago

फडणवीसांना राहुल गांधींवर टीका करण्याचा आजारच जडला! हर्षवर्धन सपकाळ

निवडणूक आयोगाच्या प्रश्नांची उत्तरे फडणवीस का देतात? आयोगाचे प्रवक्ते आहेत का?; शेतकरी, बेरोजगारीच्या प्रश्नांवर उत्तर…

1 दिवस ago

शिरुर तालुका दुष्काळाच्या छायेत असताना घोड धरणातील अवैध वाळू उपशामुळे शेतकरी चिंताग्रस्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असुन घोड धरणातील नदीपात्रातील बेकायदेशीर वाळू…

2 दिवस ago

पुणे जिल्हा बँकेसाठी शिरुरमध्ये शिवसेनेची मोर्चेबांधणी; जिल्हाप्रमुख बाप्पुसाहेब शिंदे यांचे नाव चर्चेत

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरु झाली असुन, जिल्ह्यातील…

2 दिवस ago