Shivajirao Adhalrao Patil

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?

मुख्य बातम्या राजकीय

पुणेः शिरूर लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच शिरूर लोकसभेची जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरा झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. आढळराव पाटील यांची ‘म्हाडा’वर बोळवण केल्याचे स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्र्यासोबत मंगळवारी रात्री राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री दिलीप वळसे पाटील यांची बैठक पार पडली. बैठकीला शिवसेनेकडून इच्छुक आढळराव पाटील देखील उपस्थित होते. सध्या शिरुर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील, भाजपचे प्रदीप कंद आणि विलास लांडे इच्छुक आहेत. शिरुर लोकसभेसाठी अद्याप उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब नाही.

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा सुरू आहे. आढळराव पाटील यांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांच्या उमेदवारीचा पत्ता कट केल्याचे म्हटले जात आहे.

शिरुर लोकसभेचा उमेदवार ठरवण्यासाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासह जुन्नर तालुक्यातील नेतेमंडळींची वर्षा बंगल्यावर बैठक पार पडल्याची माहिती आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा करण्यासाठी अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील, माजी आमदार शरद सोनवणे आणि इतर मतदार संघातील नेतेमंडळी देखील उपस्थित होती. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आढळराव पाटील आणि इतर नेत्यांना बाहेर ठेवून बंद दाराआड दिलीप वळसे-पाटील आणि अजित पवार यांच्याशी चर्चा केल्याची माहिती आहे. या प्रकारानंतर शिवाजीराव आढळराव पाटील वर्षा बंगल्यावरुन आपल्या सहकाऱ्यांसह बाहेर पडले. घडलेल्या प्रकारामुळे ते नाराज असल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, शिरुर मतदारसंघात मी लढणार, मी निवडणुकीला उभे राहणार आणि निवडूनही येणार असे म्हणत आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना आव्हान दिले होते. शिरुर लोकसभेसाठी आढळराव इच्छुक असल्याचे संकेत मिळत होते, मात्र, आता ही जागा राष्ट्रवादीकडे गेली आहे.

रांजणगाव गणपती येथे शिवसेनेच्या वतीने आज हळदी कुंकू तसेच होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी निवडणूकीबाबत फोडली डरकाळी…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

मोठा गौप्यस्फोट! आढळराव पाटील शरद पवार यांच्या संपर्कात…

दिलीप वळसे पाटील आणि मी काही वैरी नाहीः आढळराव पाटील

राजकीय भूमिका लवकरच जाहीर करणार: आढळराव पाटील

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…