मुख्य बातम्या

हृदयद्रावक! शिरूर तालुक्यातील मुलाचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू…

शिक्रापूर : खेळता असताना चेंडू पत्र्यावर गेला म्हणून तो काढायला गेलेल्या 12 वर्षांच्या चिमुकल्याला वीजेचा धक्का लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पाबळ (ता. शिरूर) येथे घडली आहे. या घटनेमुळे कुटुंबियांवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

घराच्या पत्र्यावर गेलेला चेंडू काढणे हर्षल पिंगळे (वय १२) या चिमुकल्याच्या जीवावर बेतले आहे. पत्र्यावर गेलेला चेंडू काढताना त्याला विजेचा धक्का लागला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शिक्रापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्षल पिंगळे या बारा वर्षीय मुलाचा खेळत असताना चेंडू घरावरील पत्र्यावर गेला होता. तो काढण्यासाठी संध्याकाळच्या सुमारास हर्षल हा घरावरील पत्र्यावर चढला. चेंडू घेऊन खाली उतरत असताना घरावरुन गेलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाला.

दरम्यान, पांडुरंग ढोले यांनी लाकडी काठीने हर्षल याला बाजूला करत जवळील रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी हर्षल पिंगळे याचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार राकेश मळेकर करत आहेत.

कौतुकास्पद; रांजणगाव पोलीसांनी खुन करुन फरार झालेल्या आरोपीच्या २४ तासात आवळल्या मुसक्या

शिक्रापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा…

शिरूर! काही मिनिटातच फोर व्हीलर गाड्या लंपास करणारा कुख्यात चोरटा गजाआड…

माजी सरपंच बिपीन थिटे यांचेवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार…

शिरूर तालुक्यात कंटेनरच्या धडकेत पादचारी गंभीर जखमी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मतदार वगळण्यावरून काँग्रेसचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्रातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षणावरून काँग्रेसने निवडणूक आयोग आणि राज्य सरकारवर गंभीर आरोप…

11 तास ago

दुष्काळाने शेतकरी उद्ध्वस्त; सरकार मात्र कागदी घोडे नाचवतंय; हर्षवर्धन सपकाळ

‘गणराया, सरकारला शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची सुबुद्धी दे’; राहुल गांधींवरील फडणवीसांच्या टीकेवरही सपकाळांचा निशाणा मुंबई:…

12 तास ago

घोड पाटबंधारे विभागाची भुमिका संशयास्पद…? पोलिसांना दिलेल्या पत्रात फक्त ठराविक वाळु माफियांची नावं

शिरुर (तेजस फडके) घोड धरणाच्या जलाशय परिसरात दिवसाढवळ्या आठ ते नऊ यांत्रिक बोटिंच्या साह्याने बेसुमार…

19 तास ago

तीन हजारांच्या पारितोषिकासाठी अनवाणी धावली आई; आता देशभरातून मदतीचा हात

बीड : मुलींच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी अवघ्या तीन हजार रुपयांच्या पारितोषिकाच्या आशेने अनवाणी धावत, हातात…

2 दिवस ago

हेक्टरी १ लाखांची मदत, सरसकट कर्जमाफी आणि विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करण्याची हर्षवर्धन सपकाळांची मागणी

मुंबई/बुलढाणा: मागील ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके करपून गेली असून राज्यातील शेतकरी गंभीर…

2 दिवस ago

शिरूर तालुक्यात क्रिकेट खेळण्यावरून तुफान राडा; बॅट-स्टंपने मारहाण; पाच जणांना अटक…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): क्रिकेट खेळायला न घेतल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर थेट मारामारीत झाल्याची घटना…

2 दिवस ago