शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शिक्रापूरच्या वतीने निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोपीस योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
संघटनेच्या वतीने महेश चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन दिले. याप्रसंगी अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे मा. प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर हे उपस्थित होते. यावेळी शांततेत मोर्चा पाडण्यात येऊन घडलेल्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. यावेळी विश्व हिंदू परिषदेचेपदाधिकारी, पंचक्रोशतील ग्रामस्थ उपस्थित होते.
दरम्यान, शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका अल्पवयीन तीन वर्ष वीस दिवसांच्या चिमुकलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. बलात्कार करणारा आरोपी १३ ते १४ वर्षाचा अल्पवयीन आहे. याबाबत पीडित मुलीच्या आई-वडिलांनी शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे.
अल्पवयीन पीडित मुलीच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी (ता. २५) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पीडित मुलगी घरात खेळत होती. घराला बाहेरून कडी लावून कपडे वाळत घालण्यासाठी बिल्डिंगच्या टेरेसवर गेल्यानंतर कपडे वाळत घालून खाली घरी आल्यानंतर घराचा दरवाजा उघडा दिसला. घरात पाहिले असता, घरातील बेडवर अल्पवयीन आरोपी याने मुलीवर अतिप्रसंग केल्याचे दिसले, त्यानंतर तो तिथून पळून गेला. चिमुकलीला प्राथमिक उपचारासाठी शिक्रापूर येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या संदर्भातील पूर्ण माहिती शिक्रापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार मध्ये दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहिणी शिनवले करत आहेत.
धक्कादायक! शिरूर तालुक्यात अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार…
शिक्रापूरमध्ये पोलिस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर वेश्याव्यवसाय; ५ ताब्यात…
शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार…
शिरुर मध्ये नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी देत मुलीवर वारंवार बलात्कार
शिरुर तालुक्यात गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार
शिरुर तालुक्यात महिलेला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी देत केला बलात्कार
शिरुर तालुक्यातील सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा अटक