मुख्य बातम्या

Video: शिरूर तालुक्यातील तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमणारः संदीपसिंग गिल

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. राज्यातील दहा हजार मिसींग तपासण्यात आले असून, CCTV फुटेजवर टीम काम करत आहे. मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिली.

खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत जळालेले मृतदेह सापडून सात दिवस उलटले तरी आरोपी सापडलेले नाहीत. यासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे. पुणे-नगर महामार्गावरील गावांची लोकसंख्या पाच ते सहा पटींनी वाढली असून, भाडेकरूंविषयी अद्ययावत माहिती नसल्याने तपासात अडथळे येत आहेत. यावर उपाय म्हणून भाडे कराराचे अॅप तयार केले जाणार असून, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींची माहिती देणे आणि भाडेकरूंची कागदपत्रे पोलिस पाटील, सरपंच आणि ग्रामपंचायतीला सादर करणे घरमालकांना बंधनकारक केले जाईल. खंडाळे आणि रांजणगाव हद्दीत आढळलेल्या जळालेल्या मृतदेहांच्या तपासासाठी विशेष पोलिस पथक नेमण्यात येणार आहे, असे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी सांगितले.

शिरूर तालुक्यातील पोलिस पाटलांच्या बैठकीत गिल बोलत होते. यावेळी पोलिस पाटलांनी तालुक्यातील काही समस्या मांडल्या. यामध्ये मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण, बिबट्याचा वाढता उपद्रव, बेट भागातील अवैध धर्मांतर, गुर्‍हाळांमुळे परप्रांतीयांचा वाढता भरणा, चाकण-शिक्रापूर रस्त्यावरील अपघात आणि पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडी यांचा समावेश आहे. या समस्यांवर लवकरात लवकर उपाययोजना केल्या जातील, असे गिल यांनी आश्वासन दिले.

पोलिस पाटील हे पोलिसांचे नाक आणि डोळे असून, गावातील अनुचित घटना, संशयित आणि अनोळखी व्यक्तींची माहिती तात्काळ पोलिसांना देणे आवश्यक आहे. तसेच, ग्रामपंचायत प्रशासन, पोलिस पाटील, पोलिस आणि ग्रामस्थांनी नोकरी-व्यवसायानिमित्त येणाऱ्या भाडेकरूंवर कडक नजर ठेवावी. शाळा-महाविद्यालयांबाहेर टवाळखोरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिस तत्पर राहतील. पोलिस पाटलांनी महिन्यातून एकदा गावातील माहिती अधिकाऱ्यांना द्यावी आणि अंमलदाराने आठवड्यातून एकदा गावाला भेट द्यावी. रोमिओंचा बंदोबस्त करण्यासाठी ग्रामस्थ आणि कुटुंबियांचा सहभाग आवश्यक आहे. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे द्यावेत, तरुणांनी सायबर गुन्ह्यांपासून सावध राहावे, ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित करावी आणि सर्व ग्रामपंचायतींनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अशा सूचना पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांनी दिल्या आहेत.

दरम्यान, केंदूर ग्रामपंचायतीने सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याशिवाय घराची नोंद न करण्याचा निर्णय घेतला, तर जातेगाव बुद्रुक येथे मुलींना लाठी-काठी प्रशिक्षण दिले जात आहे. या दोन्ही उपक्रमांचे गिल यांनी कौतुक केले आहे.

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

शिरूर तालुका तिहेरी हत्याकांडाने हादरला; महिलेसह दोन चिमुकल्यांची क्रूर हत्या…

शिरूर शहरात बंद घर फोडून दागिने चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल

शिरूर बसस्थानकावरून पर्समधुन ८ तोळे सोने चोरी करणा-या त्या सराईत दोन महीला आरोपींना केले जेरबंद

शिरूर येथे लाखोंच्या फसवणुकीचा प्रकार उघड, पोलिसांकडून तपास सुरू

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

7 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

3 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago