मुख्य बातम्या

शिरूरमध्ये डिजिटल ‘पोर्टर’ अ‍ॅपमधून ‘एमडी’ चा पुरवठा; लाखोंचा मुद्देमाल जप्त, तिघे जेरबंद…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे थेट ‘घरपोच नशा’ पोहोचवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत ‘एमडी’ अंमली पदार्थाचा मोठा साठा उघडकीस आला असुन ‘पोर्टर’ या डिलिव्हरी अ‍ॅपच्या माध्यमातून हा माल पुरवला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कारवाईत तब्बल २१ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

केंद्र शासनाच्या नशामुक्त भारत अभियानाच्या पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण पोलिसांनी ड्रग्सविरोधात आक्रमक मोहीम सुरु केली आहे. त्याच मोहिमेचा भाग म्हणून १७ एप्रिल रोजी शिरुर परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे न्हावरा फाटा ते बाबुरावनगर मार्गावरील शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर पोलिसांनी सापळा रचला. दोन चारचाकी वाहनांमध्ये संशयास्पद हालचाल सुरू असल्याचे दिसताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी न्हावरा फाटा ते बाबुरावनगर मार्गावरील शिवसाईलिला मंगल कार्यालयासमोर सापळा रचला. दोन चारचाकी वाहनांमध्ये संशयास्पद हालचाल सुरु असल्याचे दिसताच पोलिसांनी तात्काळ छापा टाकला. या कारवाईदरम्यान विशाल मारुती मोरे (वय २०, रा. बाफनामळा), प्रतीक संतोष लंघे (वय २५, रा. करडे), मिथुन विजयपाल सिंग (वय २६, रा. सावतामाळी नगर) या तिघांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता ४७.६० ग्रॅम ‘एमडी’ ड्रग्स, तसेच दोन चारचाकी वाहने असा कोट्यावधींचा माल जप्त करण्यात आला.

‘घरपोच ड्रग्स’ पोहचविण्याची पद्धत…
पोलिस तपासात समोर आलेली बाब अधिकच धक्कादायक आहे. आरोपींनी अंमली पदार्थाची डिलिव्हरी करण्यासाठी ‘पोर्टर’ या अ‍ॅपचा वापर केल्याचे निष्पन्न झाले आहे. म्हणजेच, सामान्य पार्सल सेवांचा वापर करुन ड्रग्स थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवले जात होते. या नव्या ‘डिजिटल रॅकेट’मुळे कायद्याच्या अंमलबजावणीसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. पोलिसांनी या अ‍ॅपच्या माध्यमातून ड्रग्स स्वीकारणाऱ्या ग्राहकांची माहिती गोळा करण्यास सुरुवात केली असून काही संशयितांचे रक्त नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या साखळीत आणखी अनेक जण अडकण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

एनडीपीएस अंतर्गत गुन्हा दाखल…
या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून ड्रग्सचा मुख्य पुरवठादार अजून फरार आहे. कुरिअर आणि डिलिव्हरी नेटवर्कचा गैरवापर करणाऱ्या संपूर्ण साखळीचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवली आहे. शिरुर शहरासह ग्रामीण भागात वाढणाऱ्या ड्रग्सच्या संकटावर पोलिसांनी कडक भूमिका घेतली आहे. “अंमली पदार्थाशी संबंध आढळल्यास कोणालाही सोडले जाणार नाही,” असा इशारा पोलिसांनी दिला आहे. विशेषतः युवकांना लक्ष्य करणाऱ्या या रॅकेटवर आता सतत कारवाई होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. शिरुरमध्ये उघडकीस आलेले हे प्रकरण केवळ ड्रग्स जप्तीचे नाही, तर ‘तंत्रज्ञानाच्या आडून वाढणाऱ्या गुन्हेगारीचे’ धक्कादायक वास्तव आहे. ‘क्लिक करा आणि नशा मागवा’ अशी परिस्थिती निर्माण होत असताना, पोलिसांनी दिलेला हा जबरदस्त दणका ड्रग्स माफियांसाठी मोठा इशारा ठरत आहे.

सदरची कामगिरी कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप सिंह गिल्ल, पुणे विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली, शिरुरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शिरुरचे पोलिस निरीक्षक संदेश कंजळे, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक राहुल गावडे, पोलिस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, शिरुरचे पोलिस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अंमलदार तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, सागर धुमाळ, राजू मोमीण, सागर नामदास, तुषार भोईटे, संतोष भापकर, गणेश धनवे, अमोल शेडगे, मंगेश भगत, सचिन घाडगे, अजित भुजबळ, राहुल पवार शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सचिन भोई, नितेश थोरात, अंबादास थोरे यांनी केली असून सदर गुन्हयाचा पुढील तपास शिरुर पोलिस स्टेशनचे पोलिस हवालदार अनिल आगलावे हे करत आहेत.

शिरुरमध्ये ‘एमडी’चा सुळसुळाट उघड; अल्पवयीनाच्या हातून लाखोंचा मेफेड्रोन जप्त, पोलिसांची धडक कारवाई

शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

ड्रग्ज माफियांचा काळा धंदा उघडकीस! कोंबड्यांच्या शेडमध्ये सुरू होता एमडी ड्रग्जचा कारखाना

शिरूरमध्ये एमडी ड्रग्जविरोधात धडक कारवाई; कोट्यावधींच्या मुद्देमालासाह आरोपीला अटक…

शिरुरमध्ये ATS ने धडक कारवाई करत गावठी पिस्टलसह दोघांना घेतले ताब्यात

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

21 मिनिटे ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

29 मिनिटे ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

31 मिनिटे ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

4 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

4 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

4 तास ago