rohan-bombe-pimparkhed
शिरूर (सुनिल जिते) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे भरदिवसा आज (रविवार) दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे (वय १३) या मुलावर हल्ला करत ऊसाच्या शेतात ओढून नेले. या हल्ल्यात मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे पिंपरखेड परिसरात खळबळ उडाली आहे.
पिंपरखेड येथे आज दुपारी पावणे चारच्या सुमारास रोहन विलास बोंबे (वय १३) हा मुलगा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता. घराजवळ असलेल्या हत्ती गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर अचानक झडप घालून ऊसाच्या शेतात ओढत नेले. दरम्यान, मुलगा दिसत नसल्याने आई वडिलांनी तत्काळ शेजारील लोकांना बोलावून शोध घेतला. तरूणांनी जोराचा आरडाओरड करत जवळच्या ऊसाच्या शेतात शोध सुरू केला. यावेळी त्यांना रोहन मृतावस्थेत आढळला. अतिशय हृदयद्रावक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाची गाडी पलटी करून पेटवून दिली.
दरम्यान, वीस दिवसांत तिसरी घटना घडली असून या घटनेने पिंपरखेड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत. दोन घटना घडूनही वनविभागाकडून बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवले…
रोहनच्या मृत्युच्या घटनेने पिंपरखेड ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला असून ठोस निर्णय झाल्याशिवाय मुलाचे शवविच्छेदन करण्यात येणार नाही. दोन वेळा रास्तारोको आंदोलन करून संवेदनाहीन वनविभाग व शासनाला जाग येत नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन पेटवून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
शिरूर तालुक्यात बिबट्याचा दहशतीचा कहर कायम; आठ दिवसांत दुसरा बळी…
शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू
Video; शिरुर तालुक्यात शेतकऱ्यांवर दुहेरी संकट; एकीकडे बिबटया तर दुसरीकडे केबल चोरी
शिरुर (तेजस फडके) रांजणगाव-कारेगाव जिल्हा परिषद गटातील भाविकांसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य स्वाती पाचुंदकर तसेच…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील चांडोह येथे किरकोळ वादातून महिलेस व तिच्या मुलाला व…
शिरूर (अरुणकुमार मोटे) : ग्रामीण भागात रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळावी, या उद्देशाने शासनाने आरोग्य…
शिरुर (अरुणकुमार मोटे) नागपुर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय नेमबाजी स्पर्धा २०२५-२६ मध्ये शिरुर तालुक्याच्या दोन…
रांजणगाव गणपती (तेजस फडके) लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त एकता दिवस (Run…
कोरेगाव भीमा (ता. शिरूर): पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथील डिंग्रजवाडी फाट्याजवळ आज (गुरुवार) आठवडे बाजाराच्या…