शिरूर! हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये अनेक धक्कादायक बाबी…?

क्राईम मुख्य बातम्या शिरूर तालुका

रांजणगाव गणपती (तेजस फडके): शिरुर तालुक्यात उघडकीस आलेल्या हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमुळे संपुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे. या रॅकेट मधून लाईफ केअर हॉस्पिटलचा सर्वेसर्वा डॉ. आकाश सुभाष मलगुंडे (रा. ढोकसांगवी, ता. शिरुर, जि. पुणे) याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे (रा. केसनंद, ता. हवेली, जि. पुणे) करोडो रुपयांची ‘माया’ कमविल्याची ढोकसांगवी सह परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

ढोकसांगवी (ता. शिरुर) परिसरात बुधवारी (ता. 4) मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा शिरुर आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे हे दोघे पोलिस कोठडीत असून पोलिसांचा तपास सुरु आहे. या कारवाईत डॉक्टर आणि एजंटला ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान अनेक खुलासे होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

कसा चालत होता गैरप्रकार…
सदर डॉक्टर मोबाईल ॲपच्या माध्यमातून गर्भलिंग तपासणी करत होता. तसेच त्यासाठी लाखों रुपयांची मोठी रक्कमही आकारली जात असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. गेली अनेक वर्ष हा काळाबाजार सुरु असल्यामुळे डॉक्टर आणि एजंट यांनी या काळ्या धंद्यातुन करोडो रुपयांची माया जमा केली असल्याची गावात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

आलिशान गाडी अन करोडोंची माया
मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करणारा डॉ आकाश मलगुंडे याच्यासह एजंट नरेंद्र ठाकरे या दोघांनी मिळून करोडो रुपयांची माया जमवली आहे. डॉक्टरकडे असणाऱ्या आलिशान गाडीतही एका विशिष्ट मशीनच्या साह्याने हा ‘गर्भलिंग निदान’ चा गैरप्रकार चालत होता अशी खात्रीलायक माहिती ‘एका जागरुक’ नागरिकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितली. तसेच सध्या या डॉक्टरच्या लाखों रुपयांच्या बंगल्याचेही काम सुरु असल्याचीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

याबाबत वाघोली पोलिस स्टेशनचे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक विजय चंदन यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शविली. त्यामुळे पोलिस तपासाबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही.

शिरुर; हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेटमध्ये तालुक्यातील नामांकित डॉक्टरांचा सहभाग…? 

शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

गर्भाशयातील गाठी काढण्याच्या नावाखाली गर्भाशयच काढले; पुण्यात त्या हॉस्पिटलच्या 4 डॉक्टरांसह 5 जणांवर गुन्हा

गर्भधारणेसाठी योग्य वय कोणत