मुख्य बातम्या

शिरूर! बिबटयाच्या हल्ल्यात दहा बकऱ्या आणि घोडा ठार…

शिरूर (अरूणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील बिबट्याच्या हल्ल्यात बकऱ्या १० ठार तर पाच जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. ६) पहाटे शास्ताबाद शिवारात उघडकीस आली. दुसऱ्या घटनेत निमगाव दुडे येथील राहुल घुले यांचा घोडा बाहेर असताना बिबट्याने हल्ला करून ठार केला आहे.

शिरूर तालुक्यातील शास्ताबाद येथील शेतकरी चंद्रकांत गोरडे यांची शास्ताबाद शिवारातील गट नंबर.९१ मध्ये वडिलोपार्जित शेती आहे. या शेतात त्यांनी पशुधनासाठी मोठी जाळी तयार केली आहे. या जाळीत त्यांनी बकऱ्या ठेवल्या होत्या. शेतकरी गोरडे यांनी रविवारी (ता. 5 ) सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास जाळी बंद केली आणि शेतातून घरी परत गेले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास बिबट्याने जाळीच्या आत प्रवेश करून बकऱ्यांवर हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने दहा बकऱ्यांचा फडशा पाडला. तर, पाच बकऱ्या जखमी झाल्या होत्या. जखमींपैकी एक बकरी (ता. ६) सायंकाळी सहाच्या सुमारास दगावली. अन्य जखमी बकऱ्यांवर उपचार सुरू आहेत.

शेतकरी चंद्रकांत गोरडे हे सकाळी आठ वाजताच्या सुमारास शेतात गेले असता, सदर प्रकार उघडकीस आला. या घटनेत त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अन्य बकऱ्या जखमी असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. माहिती मिळताच वनरक्षक गणेश पवार हनुमंत कारकूड कारकूड यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची दहशत पसरली आहे. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला शासनाकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे. निमगाव दुडे येथील राहुल घुले यांचा घोडा बाहेर असताना बिबट्याने हल्ला करून ठार केला आहे.

बिबट्याची दहशत कायम…
काही दिवसांपूर्वी कान्हूर मेसाई शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी जखमी झाला होता. शास्ताबाद शिवारात एका शेतकऱ्याला मादी बिबट्यासह दोन शावक मुक्तसंचार करताना दिसून आले होते. त्यापूर्वी चिंचोली मोराची, कान्हूर मेसाई, लाखेवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ सुरू होता. त्यावेळी बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी झाले होते. आता शास्ताबाद शिवारात बिबट्या अवतरला आहे. वनविभागाने या हिंस्त्रप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ…
सध्या रब्बीचा हंगाम असल्याने शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जावे लागते. परंतु, शिरूर तालुक्यातील विविध भागात बिबट्याचा मुक्तसंचार दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी व शेतमजुरांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. अनेक ठिकाणी मजूर वर्ग शेतात जाण्यास धजावत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे. वनविभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

शिरुरच्या पुर्व भागातील पिंपळसुटी गावात बिबट्याच्या हल्ल्यात चार वर्षीय चिमुरडीचा मृत्यू

शिरूर! आई-वडिलांचे भांडण अन् चिमुकल्याचा बिबट्याने घेतला जीव…

वाघाळे येथील उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या झाला जेरबंद; 16 कोंबड्यांचा पाडला फडशा…

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

16 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

16 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

16 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

16 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

16 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

16 तास ago