leopard-waghale

वाघाळे येथील उपसरपंचांच्या धाडसामुळे बिबट्या झाला जेरबंद; 16 कोंबड्यांचा पाडला फडशा…

शिरूर तालुका

वाघाळेः वाघाळे (ता. शिरूर) गावचे उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या धाडसामुळे बिबट्या जेरबंद झाला आहे. बिबट्याने तब्बल सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला आहे.

वाघाळे येथील सोनवणे वस्तीवर आज (रविवार) पहाटे चारच्या सुमारास उपसरपंच दादासाहेब सोनवणे यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात बिबट्या शिरला होता. दादासाहेब सोनवणे यांना कोंबड्यांचा आवाज आल्याने जाग आली व जाळीमध्ये बिबट्या असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी प्रसंगावधान राखून शिताफिने खुराड्याचा दरवाजा बंद केला व वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांच्याशी फोनवर संपर्क केला. हनुमंत कारकूड यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून रेस्क्यू टीम बोलावली.

वन परीक्षेत्र अधिकारी श्री प्रताप जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल श्री. म्हेत्रे, वन कर्मचारी हनुमंत कारकूड, रेस्क्यू टीमचे जयेश टेमकर, ऋषिकेश विधाटे, शुभम शिस्तार, सुदर्शन खराडे, सचिन गोडसे यांनी मोठया शिताफिने पिंजऱ्यात बिबट्यास जेरबंद केले. सरपंचांनी केलेल्या धाडसाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

दरम्यान, बिबट्याने सोळा कोंबड्यांचा फडशा पाडला आहे. दादासाहेब सोनवणे यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी माजी चेअरमन सूर्यकांत बढे, नितीन भोसले, बबनराव भोसले, दिलीप थोरात, एकनाथ डफळ यांनी केली आहे.

शिरुर-तांदळी रस्त्यावर गुनाटजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार

जांबुत; बिबट्याच्या हल्यात महिलेचा मृत्यू ग्रामस्थ आक्रमक, गाव बंद ठेवुन पदयात्रा काढत केला रास्ता रोको

शिरुर तालुक्यातील कान्हूर मेसाई गावात बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

तळेगाव ढमढेरे जगतापवस्ती येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला…

शिरूर तालुक्यात बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला…

Video; शिरुर; बिबट्याची मादी कोंबडी खायला गेली अन खुराड्यात अडकली