शिरूर तालुक्यात युवकाला दुचाकीस्वाराने दिली धडक; युवक गंभीर जखमी…

क्राईम

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील रामलिंग-शिरूर या रस्त्यावर शिरूर बाजूकडे रस्त्याच्या कडेने पायी चाल जात असताना सोमवारी (ता. २८) रात्री ०९:३० वाजता एम्पायर सोसायटी समोर पाठीमागून येणा-या मोटार सायकलवरील चालकाने निखिल अच्छा यांना पाठीमागून येवून मोटारसायकलची जोरदार धडक दिली. निखिल यांना डोक्याला मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत.

अपघात करणाऱ्याचे नाव ज्ञानेश्वर वैजीनाथ सुतार (रा. जोशीवाडी, शिरूर) असे असून मोटार सायकल क्र. MH १२ UQ ६७९५ असा आहे. अपघातात निखील यांच्या डोक्याला मार लागल्याने डोक्यामध्ये रक्तस्त्राव होवून मेंदुच्या बाजुने रक्ताच्या गाठी तयार झाल्या आहेत. शरीराच्या उजव्या बाजुला छाती, हातापायाला मार लागला आहे. निखील यांची प्रकृती चिंताजनक वाटल्याने त्यांना डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचारकामी सहयाद्री हॉस्पीटल, शास्त्रीनगर, पुणे. येथे अॅडमीट केले असून त्यांच्यावर तेथे औषध उपचार चालू असून ते अदयापपर्यत शुध्दीवर आले नाहीत.

गंभीर दुखापतीस कारणीभुत होवुन अपघाताची खबर न देता चालक ज्ञानेश्वर वैजीनाथ सुतार पळून गेला आहे. त्याच्याविरुद्ध निखिल यांची पत्नी सोनाली निखिल अच्छा यांनी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरूर तालुक्यात युवकाचा खून; खुनी दोन तासात पोलिसांच्या ताब्यात…

शिरूर तालुक्यात सामाजिक बांधिलकी जपत सोनसाखळी केली परत…

शिरूर तालुक्यात कोयता दाखवत रस्त्याने दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

शिरूर तहसील कार्यालयात धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन…

शिरूर तालुक्यातील मुलीच्या उपचारासाठी हवाय मदतीचा हात!