मुख्य बातम्या

शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात आला वेग!

संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे आणि www.shirurtaluka.comने आवाज उठवत सातत्याने बातम्यांची मालिका सुरू ठेवली आहे. संबंधित घटनेची वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामाला कागदोपत्री नव्हे तर आता प्रत्यक्षात वेग आला आहे.

शिक्रापूर ते मलठण दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन अडीच महिने उलटूनही रस्त्याच्या कामामध्ये प्रगती नव्हती. रस्त्याचे काम काय फक्त कागदोपत्री सुरू आहे काय? अशा शिर्षकाखाली www.shirurtaluka.comने बातमी प्रसिद्ध केली होती. शिवाय, वेबसाईटचे संपादक तेजस फडके यांनी घटनास्थळी जावून थेट नागरिकांशी संवाद साधला होता. यावेळी नागरिकांनी ठेकेदाराबाबत संताप व्यक्त केला होता. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रतिक्रियांच्या माध्यमातून अनेकांनी ठेकेदावर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.

दरम्यान, शिक्रापूर-मलठण रस्ता हा मोठा वर्दळीचा आहे. परंतु, गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून संपूर्ण रस्ताच खोदून ठेवल्यामुळे वाहन चालकांबरोबच वाघाळे, गणेगाव, बुरुंजवाडी येथील ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पुढील काही दिवसांमध्ये कामात सुधारणा दिसली नाही तर शिक्रापूर चौकात आंदोलन उभारले जाईल, असा इशारा नागरिकांनी दिल्यानंतर काम सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे.

शिक्रापूर-मलठण रस्त्याच्या दयनीय अवस्थेबाबत मंत्रालयापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यत सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर काम सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन रस्त्याचे चांगल्या प्रकारे काम व्हावे, एवढीच अपेक्षा आहे. शिवाय, संबंधित ठेकेदाराने मुरुमाऐवजी मातीचा वापर केलेला दिसून येत आहे. कामात मुरुमाचा वापर करणे अपेक्षित आहे, असे अशोक सोनवणे यांनी म्हटले आहे.

शिक्रापूर-मलठण रस्त्याचे काम फक्त कागदावरच सुरू आहे काय?

शिक्रापूर-मलठण रस्त्याची अवस्था जशीच्या तशी; ठेकेदाराने धरले वेठीस!

शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…

शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

‘भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचाच मेंदू चोरीला गेला’; नाना पटोलेंचा फडणवीसांवर घणाघाती पलटवार

ज्ञानेशकुमार-भाजपाची अभद्र युती; ‘मतचोरी’विरोधातील लढाई सुरूच राहणार असल्याचा काँग्रेसचा इशारा मुंबई: निवडणूक आयोग स्वायत्त संस्था असली…

3 तास ago

मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी १२ ऑक्टोबरची मुदत अपुरी; आणखी दोन महिने वाढवा

मुंबई: राज्यात सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादीतील नावांसंदर्भात दावे व हरकती…

3 तास ago

Video: शिरूर तालुक्यात गोळीबार, डोक्यात गोळी लागल्याने एकाचा मृत्यू; गुन्हा दाखल…

शिरूर (तेजस फडके) : कारेगाव (ता. शिरुर) येथील साईनगर परिसरात आज (मंगळवार, ता. २९) सकाळी…

19 तास ago

एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र धोरण; समितीचा अहवाल शासनाकडे

मुंबई : एकल माता पालक कुटुंबातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना भेडसावणाऱ्या आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिक…

2 दिवस ago

मतदारयादीतील फेरफाराच्या आरोपांवर काँग्रेसचा राज्यभर एल्गार

मुंबई: मतदारयाद्यांमध्ये फेरफार करून लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप करत काँग्रेसने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्या…

2 दिवस ago

‘दादा… तुम्ही नाही, हे मन आजही मानायला तयार नाही’; सुनेत्रा पवार भावुक

बारामती: “दादा… तुम्ही नाही, असं मन आजही मानायला तयार नाही,” अशा भावनिक शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय…

2 दिवस ago