संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com
शिरूर : शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होऊन दोन महिने उलटूनही रस्त्याची अवस्था जैसे थेच असल्याने नागरिकांचा संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ठेकेदाराकडून नियोजनाचा अभाव, सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष आणि कामातील कासव गतीमुळे हा रस्ता अक्षरशः मृत्यूचा सापळा ठरत असल्याची तक्रार स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
शिक्रापूर-मलठण मार्गावरून बुरुंजवाडी, गणेगाव, वाघाळे, मलठण या गावांतील नागरिकांना दररोज ये-जा करावी लागते. मात्र, रस्त्यावर मोठमोठे खड्डे, अर्धवट खोदकाम, मातीचे ढिगारे आणि कोणतीही इशारा फलक नसल्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अपघातांमुळे अनेकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. मात्र, ठेकेदाराला कशाचे देणे-घेणे नाही. प्रवाशांचा जीव गेल्यानंतर आणि नागरिकांचा उद्रेक झाल्यानंतरच ठेकेदाराला जाग येणार आहे का? असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत.
View this post on Instagram
शिक्रापूर-मलठण मार्गावरील गावातील नागरिकांना महत्त्वाच्या कामासाठी शिक्रापूर-पुणे प्रवास करावा लागत आहे. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदाराने गावांचा जगाशी संपर्कच तोडला आहे. मनमानीप्रमाणे काम सुरू असून, ठेकेदार कोणालाच जुमानत नाही. पावसाळ्यापूर्वी रस्ता कसा करणार? कसा होणार हे देवालाच माहित. त्यामुळे पहिला रस्ता चांगला होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. पण, रस्त्याचे काम घेऊन अनेकांना वेठीस धरले आहेच पण अनेकांच्या जीवाशी खेळताना दिसत आहे, अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत.
‘एखाद्या व्यक्तीला या रस्त्यावरून प्रवास करण्याची वेळ आलीच तर वरून उन्हाचा चटका आणि जमीनीवरील खड्डे आणि धुराळा यामुळे अत्यंत दयनीय अवस्था होत आहे. रस्त्याचे काम सुरू करून दोन महिने झाले तरी परिस्थितीत सुधारणा नाही. अपघातांची मालिका सुरूच आहे. प्रशासनाने तातडीने पाहणी करून ठेकेदारावर कारवाई करावी, अन्यथा नागरिकांसह आंदोलन करण्यात येईल,’ असा इशारा सामाजिक कार्यकर्ते अशोक सोनवणे यांनी दिला आहे.
View this post on Instagram
शिक्रापूर-मलठण रस्ता नियोजनाच्या अभावामुळे बनलाय मृत्यूचा सापळा!
शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
शिक्रापूर-मलठण रस्त्याची अवस्था जशीच्या तशी; ठेकेदाराने धरले वेठीस! https://t.co/7RbELNDp90 @Dev_Fadnavis @CMOMaharashtra @mieknathshinde @parthajitpawar @AjitPawarSpeaks @RRPSpeaks @PawarSpeaks @SunetraA_Pawar @Dwalsepatil @kolhe_amol @SantoshDhaybar
— shirur (@shirurtaluka) April 15, 2026
Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…
शिक्रापूर मार्गावरील रस्ता रुंदीकरणाचे काम ठप्प; ग्रामस्थ आक्रमक, आंदोलन करण्याचा इशारा
View this post on Instagram