(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com)
शिरूर, ता. १६ मार्च २०२६ : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू करताना कोणतेही नियम पाळलेले दिसत नाहीत. रस्त्यात मोठ-मोठे खड्डे, मातीचे ढिगारे यामुळे वाहन चालकांना रात्री-अपरात्री अपघातांना सामोरे जावे लागले आहे. रस्त्याचे काम करणारा ठेकेदार कोण आहे? याबाबतचा कोठेही फलक नाही. यामुळे रस्ता नेमका खोदला कोणी? हा प्रश्न नागरिकांना पडला असून, रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
शिक्रापूर-मलठण रस्ता नुतनीकरणाचे अनेकांनी स्वागत केले आहे. पण, रस्त्याचे काम करण्यापूर्वी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देणे, सुचना फलक लावणे, काम कोण करत आहे, किती दिवसांमध्ये पूर्ण होणार आहे याबाबतची संपूर्ण माहिती असणारा फलक लावणे आवश्यक होते. परंतु, नियमांना पूर्णपणे हरताळ फासत रस्ता उखडून टाकण्यात आला आहे. रस्त्याचे काम नेमके कोण करत आहे, याची कोणतीही माहिती कोठेही देण्यात आलेली नाही. रस्ता खोदला कोणी? हा मुळ प्रश्न असून, संबंधिताविरोधात गुन्हा दाखल केला जावा, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामादरम्यान मोठ्या प्रमाणात मातीचा वापर केला जात असल्यामुळे वाहतुकीदरम्यान प्रचंड धूळ उडत आहे. रस्त्यांवर पाणी मारले जात नसल्यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे. रस्ता खोदल्यानंतर मातीचे ढिगारे रस्त्यातच आहेत. यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. रस्त्याच्या कडेची मोठ-मोठी झाडे तोडण्यात आली आहेत, याची परवानगी घेण्यात आली होती का? झाडे तोडण्या ऐवजी त्यांचे पुर्नवसन करत आले असते. संबंधित रस्त्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या रस्त्याच्या कामाबाबत हलगर्जीपणा केला जात असल्याचे सरळ-सरळ उघड झाले आहे. संबंधित ठेकेदाराने पुढे येऊन काम चांगले करावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शिरूर तालुक्यातील शेतकरी संघटनेचे अध्यक्ष सुहास काटे, शिरूर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, वाघाळे गावचे माजी उपसरपंच दिलीप थोरात, चेअरमन अशोक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते अशोक दंडवते यांनी दिला आहे.
(क्रमशः)
View this post on Instagram
शिक्रापूर ते मलठण रस्त्याच्या कामांबाबत नागरिकांनी वाचला तक्रारींचा पाढा…
शिरूर-पाबळ रस्त्यावरील पुलावर खड्ड्यांचे साम्राज्य…
मलठण-कवठे येमाई अष्टविनायक रस्त्यावर वाढले अपघाताचे प्रमाण; ऊस वाहतूक…
शिरूर! रस्त्यावरील वाढत चाललेले खड्डे, उखडलेले डांबर; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच बिकट…
Video: पुणे-नगर महामार्गावरील वाहतूक कोंडीविरोधात शिक्रापूरकर उतरले रस्त्यावर…
शिरूर -पाबळ रस्त्यावर धोकादायक खोदकाम; नागरिकांच्या जिवितास गंभीर धोका
शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी… https://t.co/NSL8PoysHy @Dev_Fadnavis @mieknathshinde @CMOMaharashtra @nitin_gadkari @AjitPawarSpeaks @PawarSpeaks @RRPSpeaks @Dwalsepatil @kolhe_amol @SantoshDhaybar @puneruralpolice pic.twitter.com/8LeOSfBAaU
— shirur (@shirurtaluka) March 16, 2026