मुख्य बातम्या

Video: सदाभाऊ खोत शिरुरमध्ये आल्यास तोंडाला काळं फासू अन्…

शिरूर (तेजस फडके): महाराष्ट्रातील जेष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शारीरिक व्यंगाबाबत विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजप नेते सदाभाऊ खोत यांनी टिका केली होती. त्यामुळे खोत यांच्यावर सगळ्या बाजुने टिकेची झोड उठली आहे. शिरुर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी खोत यांच्या या वक्त्याव्याचा निषेध करत जर खोत शिरुर मध्ये प्रचारासाठी आले. तर त्यांच्या तोंडाला काळं फासत त्यांची गाडी फोडण्याचा इशारा दिला आहे.

‘शरद पवारसाहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी तंबीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यानंतर सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त केली. शरद पवार यांच्याबद्दल बोलताना माझ्या भाषेमुळे कुणाच्या भावना दुखाववल्या असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो असे सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

भारतीय जनता पक्षाचे जत विधानसभेचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्या प्रचारार्थ सदाभाऊ खोत यांनी जनतेला संबोधित केले. यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते शरद पवार आणि राष्ट्रवादीला खोत यांनी जोरदार लक्ष्य केले होते. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, असे जाहीर सभांमधून सांगतोय. तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी अभद्र टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी महायुतीतील घटक पक्षांचे नेते सदाभाऊ खोत यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत चुकीचे व निंदनीय आहे. आम्ही महायुतीचे घटक असलो तरी अशा पद्धतीने खालच्या पातळीवर पवार साहेबांवर वैयक्तिक टीका करणे आम्हास पूर्णपणे अमान्य आहे. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी सदाभाऊ खोत यांचा समाचार घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व वैयक्तिकरित्या मी या विधानाचा तीव्र शब्दात निषेध करतो. यापुढे पवार साहेबांवर खालच्या पातळीवर जाऊन कोणी वैयक्तिक टीका केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खपवून घेणार नाही, अशी तंबीही अजित पवार यांनी महायुतीतील नेत्यांना दिली आहे

शरद पवार आणि त्यांच्या बगलबच्च्यांनी बँका हाणल्या, कारखाने हाणले, तरी भागले नाही. तरीही भाषणांमधून महाराष्ट्र बदलायचा असे सांगत फिरतोय. तुला तुझ्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का? अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली होती.

दिलगिरी…
माझी गावगाड्याची भाषा आहे. काही लोकांनी त्या शब्दाच्या अर्थाचा विपर्यास केला. त्यातून कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो. दिलगिरी व्यक्त करतो. गावगाड्याची भाषा असते. एखादा आभाळाकडं बघत असला तर आम्ही म्हणतो आरशात जाऊन बघ. गावगाड्याची भाषा समजायला मातीत रुजावं लागतं. मातीत राबावं लागतं आणि मातीतच मरावं लागतं. तेव्हाच गावाकडेची आणि मातीची भाषा समजते अशी प्रतिक्रिया सदाभाऊ खोत यांनी दिलगिरी व्यक्त करताना दिली.

लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?

Video: शिरूर-आंबेगाव-हवेली मधील राजकीय नेत्यांनो उघडा डोळे अन् बघा निट…

‘शांताराम कटके हे कोण आहेत हे त्यांना दाखवुन देऊ’; रोख नक्की कोणाकडे…?

शिरुरकरांना शरद पवारांनी सांगितली सन १९८० ची ‘ती’ आठवण

महाराष्ट्र राज्यात सत्तापालट झाल्यानंतर घोडगंगा कारखाना नक्कीच चालु करु; शरद पवार

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

4 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago