मुख्य बातम्या

शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार चंदन सोंडेकर यांनी घेतली भेट…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर भाजपच्या नाराज पदाधिकाऱ्यांची आमदारकीचे इच्छुक उमेदवार राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी भेट घेतली आहे.

शिरूर शहरातील भापजा शहराध्यक्षांसह सोळा पदाधिकाऱ्यांनी नुकतेच राजीनामे भाजपा शिरूर तालुका अध्यक्ष आबा सोनवणे यांच्याकडे सुपुर्द केला आहे. ही बातमी कानावर येताच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे माजी प्रदेश प्रवक्ते चंदन सोंडेकर यांनी तातडीने महायुतीच्या सन्मवयाचा धर्म पाळून तालुका अध्यक्ष आबा सोनवणे, राजीनामा दिलेले शहराध्यक्ष नितीन पाचर्णे यांची भेट घेत राजीनामा मागे घ्यावा याबाबत विनंती केली आहे. चार भिंतीच्या आत पक्षाच्या वरीष्ठ नेत्यांबरोवर चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्यात यावा. नितीन पाचर्णे यांनीही स्व.मा.आमदार बाबुराव पाचर्णे यांनी कष्टाने वाढवलेला भाजपा पक्ष सोडणार नसल्याचे सुतोवाच चंदन सोंडेकर यांच्याकडे केल्याचे सोंडेकर यांनी सांगितले.

चंदन सोंडेकर हे आगामी शिरूर-हवेलीच्या विधानसभेसाठी (आमदारकी) इच्छुक असल्याने ते महायुतीच्या कार्यकर्त्यांना एक संध ठेवण्यास प्रयत्नशील आहे. पक्ष स्थापनेपासून २५ वर्ष ते राष्ट्रवादी पक्षात सक्रीय आहे. सन २०१९ ला ते अशोक पवार यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून विधानसभा निवडणुक लढले होते. त्यांनी अशोक पवार, बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर तिसऱ्या क्रमांकांचे मताधिक्य घेतले होते. फाटाफुटीनंतर अशोक पवार शरद पवार गटात गेल्यानंतर चंदन सोंडेकर अजितदादांचे नेतृत्व मान्य करून राष्ट्रवादीत स्वगृही परतले. ते आता कार्यकर्त्यांच्या प्रशासकीय अडचणींबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना लक्ष घालण्याची विनंती करणार आहे.

राजीनामा दिलेले नितीन पाचर्णे व इतर पदाधिकारी आता काय भुमिका घेतात किंवा कोणत्या पक्षात प्रवेश करणार या चर्चेला शिरूर शहरासह तालुक्यात उधाण आले आहे.

मी माझ्या वैयक्तिक कारणामुळे माझ्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. पक्षात मला योग्य मान-सन्मान मिळत आहे. माझी पक्षाच्या कोणत्याही पदाधिकाऱ्याविषयी नाराजी नाही.
– नितीन पाचर्णे

‘आंधळ दळतंय आण कुत्रं पिठ खातयं,’ अशी शिरुर-हवेलीत परिस्थिती : चंदन सोंडेकर

खळबळजनक! शिरुर शहरातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे तडकाफडकी राजीनामे

शिरुर तालुक्यात भाजपाची अंतर्गत धुसफुस चव्हाट्यावर; तालुक्यातील पदाधिकाऱ्यांवर कार्यकर्त्यांची नाराजी…?

घोडगंगा कारखान्याच्या कर्जावरून अशोक पवारांचे थेट अजित पवारांना चॅलेंज…

शिरुरच्या माजी नगरसेविका ज्योती लोखंडे यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश; अजुनही काहीजण इच्छुक

शिरूर तालुका टीम

Recent Posts

ब्रिजभूषण यांच्या सुटकेला आव्हान; महिला कुस्तीपटूंची सत्र न्यायालयात धाव

दिल्ली : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या…

59 मिनिटे ago

शिरुर तालुक्यात सापडलेल्या गांजाचे ‘श्रीगोंदा कनेक्शन’…? मुख्य सुत्रधारापर्यंत तपास पोहोचणार का…?

शिरुर (तेजस फडके) कवठे येमाई (ता. शिरुर) येथे स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण आणि शिरुर पोलिसांनी…

2 तास ago

मुंबईच्या झोपडपट्टीतून IIT मद्रासपर्यंतचा संघर्ष; आईच्या कष्टाचं चीज करत गौतम पाडीभर बनला IFS अधिकारी!

जालना: कचरा वेचक म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर खांद्यावर मोठी गोणी घेऊन रस्त्यावर फिरणारी व्यक्ती येते.…

9 तास ago

ऍलर्जीक खोकला लक्षणे व त्यावरील उपाय

ऍलर्जीक खोकला ही अत्यंत थकवा आणणारी स्थिती आहे. घशात जळजळ होते, रात्री वाढते आणि दैनंदिन…

10 तास ago

भारतीयांमध्ये का वाढतंय, हृदयाच्या आजारांचं प्रमान

भारतात आरोग्याबाबत चित्र झपाट्याने बदलताना दिसत आहे. देशात असंसर्गजन्य आजारांचं प्रमाण वाढत असून त्याचा धोकाही…

10 तास ago

बाह्य राजकीय हस्तक्षेपाला आळा; पारदर्शक निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती गठित

मुंबई: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ आणि विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी लागू असलेल्या एकरूप परिनियमांच्या अनुषंगाने विद्यार्थी…

23 तास ago