ncp logo
शिरूर (तेजस फडके) : तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर मोठा राजकीय भूकंप झाला आहे. कवठे येमाई-टाकळी हाजी जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजेंद्र गावडे यांची उमेदवारी कापून दामूआण्णा घोडे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे गावडे घराण्याने राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याचे संकेत दिले आहेत. राष्ट्रवादीने गावडे कुटुंबाचे तिकीट कापल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
जिल्हा परिषदेसाठी हा गट सर्वसाधारण झाल्यापासून राजेंद्र गावडे यांनी जोरदार प्रचार सुरू केला होता. माजी आमदार पोपटराव गावडे यांनी राष्ट्रवादीला साथ देत दिलीप वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम केले होते. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्यानंतर अचानक राजकीय समीकरणे बदलली. राष्ट्रवादी (शप) पक्षाकडून इच्छुक असलेल्या टाकळी हाजीच्या माजी सरपंचांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर झाल्याने गावडे समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या अनपेक्षित निर्णयामुळे राजेंद्र गावडे यांची आठ वर्षांची मेहनत आणि जनसंपर्क दुर्लक्षित झाल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र आणि दिलीप वळसे पाटील यांचे अत्यंत जवळचे सहकारी राजेंद्र गावडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला (अजित पवार गट) रामराम ठोकला आहे. जिल्हा परिषदेची उमेदवारी नाकारल्याने नाराज झालेल्या गावडेंचा आज (मंगळवार) पुण्यात भाजपमध्ये जाहीर प्रवेश होणार आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीने राजेंद्र गावडे यांना जिल्हा परिषदेसाठी डावलल्यामुळे शिरूरच्या राजकीय वर्तुळात नाराजीचे सूर उमटले होते. आपल्या समर्थकांचा मोठा गट सोबत घेऊन गावडे यांनी कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे वळसे पाटील यांच्या बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला मोठे भगदाड पडणार आहे. राजेंद्र गावडे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिरूरमधील महायुतीच्या गणितात आता भाजपची बाजू भक्कम झाली आहे. “पक्षात निष्ठेला किंमत मिळत नसल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे हा निर्णय घेतल्याचे” गावडे यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा
शिरूर तालुक्यातील स्वयंघोषित नेत्याला कुणीतरी आवरा हो…? माजी सैनिकाचा संताप…
शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय उलथापालथ; राजकीय गणितांना मोठा धक्का…
शिरूर! वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी रिघ…
शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…
मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…
रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…
वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…
अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…
मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…