Leader

शिरूर! वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटात उमेदवारीसाठी रिघ…

राजकीय शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके) : शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील वडगाव रासाई–मांडवगण जिल्हा परिषद गटात नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी पुरुष) आरक्षण जाहीर होताच राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या सर्वच पक्षांकडून इच्छुकांची मोठी गर्दी झाल्याने या गटात तिकीट वाटपासाठी पक्षांतर्गत चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे.

राष्ट्रवादी (अजित पवार गट) मध्ये चुरस तर भाजपकडूनही तगडे दावेदार
वडगाव रासाई–मांडवगण गटासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून घोडगंगा साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, माजी जिल्हा परिषद सदस्य दादासाहेब कोळपे, घोडगंगाचे माजी संचालक सुधीर फराटे, तसेच राजीव फराटे हे इच्छुक आहेत. तर भारतीय जनता पार्टीकडून माजी तालुकाध्यक्ष आबासाहेब सोनवणे, माजी पंचायत समिती सदस्य राजेंद्र गदादे, वडगाव रासाईचे सरपंच सचिन शेलार आणि एकनाथ शेलार हे इच्छुक आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून शिवाजी गदादे, तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून उपजिल्हाप्रमुख मछिंद्र गदादे यांनी उमेदवारीसाठी हालचाली वाढवल्या आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

मांडवगण पंचायत समिती गणात ‘ओपन महिला’ लढत रंगणार
मांडवगण पंचायत समिती गणात सर्वसाधारण महिला (ओपन महिला) आरक्षण असून मांडवगण फराटा, इनामगाव, तांदळी, गणेगाव दुमाला, बाभुळसर बुद्रुक व सादलगाव ही गावे समाविष्ट आहेत. या गणासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून दिपाली नागवडे, शिवसेना (उबाठा) कडून स्वाती मचाले, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लतिका वराळे (जगताप) या इच्छुकांमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

वडगाव रासाई गणात ‘सासरा विरुद्ध जावई’ लढत होणार?
वडगाव रासाई पंचायत समिती गण अनुसूचित जाती (SC) राखीव असून नागरगाव, आंधळगाव, कुरुळी, कोळगाव डोळस, निर्वी, धुमाळवाडी, शिरसगाव काटा, पिंपळसुटी आणि वडगाव रासाई ही गावे या गणात येतात. येथे शिवसेना (उबाठा) कडून तालुकाप्रमुख पोपट शेलार, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विजेंद्र गद्रे, बहुजन वंचित आघाडीकडून रणजित पाडळे हे इच्छुक असून, पोपट शेलार यांचे भाचे-जावई असलेले विजेंद्र गद्रे रिंगणात उतरल्यास सासरा विरुद्ध जावई अशी रंगतदार लढत पाहायला मिळू शकते.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र…? अशोक पवारांची भूमिका ठरणार निर्णायक
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत असल्याने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबतही तसाच प्रयोग होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर वाघोली येथे आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार प्रथमच एकाच व्यासपीठावर दिसल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अशोक पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे बोलले जात आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

शिरुर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात ‘शांतता’; तृप्ती सरोदे मैदानात तर बाकी उमेदवार…

Video: शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात तृप्ती सरोदे यांना वाढता प्रतिसाद…

जिल्हा परिषद निवडणूक! टाकळी हाजी जिल्हा परिषद गटाचा ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय आढावा

ZP निवडणुक; कान्हूर मेसाई, चिंचोली मोराची, शास्ताबाद गावातील ग्रामस्थ पाणीप्रश्नावर आक्रमक…? 

वाघोलीला मतदानासाठी आलात तर रडस्तोर मारून पोलिसांच्या हवाली केले जाईल…

१२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजल