Leader

शिरूर तालुक्यातील स्वयंघोषित नेत्याला कुणीतरी आवरा हो…? माजी सैनिकाचा संताप…

क्राईम शिरूर तालुका

शिरूर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात एका माजी सैनिकाच्या पत्नीची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी एकाच घरातील तीन जणांवर गुन्हे दाखल झाले होते. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. या प्रकरणातील मुख्य सुत्रधाराची बुधवारी (ता. १४) गावातील एका व्यक्तीसोबत किरकोळ बाचाबाची झाली. त्यात दगडफेक सुद्धा झाली. मात्र, माजी सैनिकाला या प्रकरणात अडकविण्यासाठी फसवणुक प्रकरणातील ‘मुख्य सुत्रधारा’ ने आपल्यावर गोळीबार झाल्याचा बनाव केला.

शिरुर पोलिसांनी तात्काळ या संपुर्ण घटनेची शहानिशा केली आणि सदर माजी सैनिकाचा या प्रकरणाशी कसलाही संबंध नसल्याचे ‘निष्पन्न’ झाले. परंतु राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी ‘सलगी’ असलेल्या शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका ‘स्वयंघोषित’ नेत्याने या माजी सैनिकावर गुन्हा दाखल होण्यासाठी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

त्यामुळे तालुक्यातील आजी-माजी सैनिक संघटनाचे पदाधिकारी संतापले आहेत. आम्ही देशाच्या रक्षणासाठी अहोरात्र झटलो. परंतु असे स्वयंघोषित राजकीय नेते जर कोणत्याही घटनेची शहानिशा न करता चुकीच्या प्रवृत्तीच्या लोकांच ऐकून स्वतःच्या फायद्यासाठी आमच्या सैनिक बांधवाना त्रास देत असतील तर त्यांची गय केली जाणार नाही. आम्ही संबंधित ‘स्वयंघोषित’ नेत्याची तक्रार थेट मुख्यमंत्री यांच्याकडेच करणार आहोत असा इशारा तालुक्यातील आजी माजी सैनिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

यावेळी ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ शी बोलताना माजी सैनिक यांनी सांगितले की, सध्या हा स्वयंघोषित नेता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीही इच्छुक आहे. विशेष म्हणजे काही वर्षांपुर्वी गुन्हेगारी पार्श्वभुमी असल्यामुळे या ‘स्वयंघोषित’ नेत्याचे नाव ‘तडीपार’ च्या यादीतही होते. त्यानंतर त्याने विविध पक्षात प्रवेश करत स्वतःची प्रतिमा काही प्रमाणात स्वच्छ करण्याचा सध्या त्याचा प्रयत्न चालु आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka)

पुढे बोलताना ते म्हणाले, ‘स्वयंघोषित’ नेत्याने विनाकारण सध्या माझ्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचे उद्योग चालवले असुन याबाबत मी कुटुंबियांना घेऊन लवकरच राज्याचे मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच विशेष पोलिस महानिरीक्षक कोल्हापुर परिक्षेत्र, कोल्हापुर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांची भेट घेऊन या स्वयंघोषित नेत्याचे सगळे ‘कारनामे’ त्यांच्या कानावर घालणार आहोत. महाराष्ट्र राज्य आजी माजी सैनिक संघटना, पुणे जिल्हा आजी माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी मिळुन लोकशाही मार्गाने आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

शिरुर; माजी सैनिक पत्नीच्या फसवणुक प्रकरणात झारीतील शुक्राचार्य असलेल्या पोलिस अधिकाऱ्याची लुडबुड सुरुच…?

शिरुर पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर माजी सैनिक पत्नीचा गंभीर आरोप; पोलिस अधिक्षकांकडे तक्रार

माजी सैनिक पत्नीच्या आर्थिक फसवणुक प्रकरणी आमदारांच्या फोन नंतरही आरोपीना अटक नाहीच; पोलिसांची भुमिका संशयास्पद…?

‘कुणी न्याय देईल का न्याय’ माजी सैनिकाच्या पत्नीची आर्त हाक; आरोपी अद्यापही मोकाट

शिरुर; माजी सैनिकाच्या पत्नीची कंपनीच्या भागीदारीत फसवणुक करत जिवे मारण्याची धमकी