मुख्य बातम्या

शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटात वृषाली वाळके, दीपक कोहकडे व स्वाती घावटे यांना वाढता प्रतिसाद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील शिरूर ग्रामीण-न्हावरे जिल्हा परिषद गटामध्ये सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या गटातील निवडणूक लढतीत वृषाली वाळके, दिपक कोहकडे आणि स्वाती घावटे या उमेदवारांना मतदारांकडून वाढता आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. प्रचाराच्या प्रत्येक फेरीत जनतेचा उत्स्फूर्त सहभाग आणि स्थानिकांचा विश्वास हे या तिन्ही उमेदवारांच्या बाजूने झुकत असल्याचे चित्र आहे.

गावागावांत घेतल्या जाणाऱ्या बैठका, घराघरांत होणारा संपर्क आणि थेट मतदारांशी साधलेला संवाद यामुळे या उमेदवारांची प्रतिमा “काम करणारे आणि सामान्यांशी जोडलेले नेतृत्व” अशी बनत चालली आहे. पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ठाम भूमिका मांडत या तिघांनी प्रचारात वेगळा ठसा उमटवला आहे.

वृषाली वाळके यांनी महिलांचे प्रश्न, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि ग्रामीण विकासावर भर देत महिला मतदारांमध्ये विशेष विश्वास निर्माण केला आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका आणि ग्रामस्थ महिलांचा त्यांना मिळणारा पाठिंबा प्रचारात स्पष्टपणे जाणवत आहे.

न्हावरे पंचायत समिती गणाचे उमेदवार दिपक कोहकडे यांनी तरुणाई आणि शेतकरी वर्गाशी मजबूत नाते तयार केले आहे. शेतीविषयक अडचणी, पाण्याचा प्रश्न, रोजगाराच्या संधी आणि पायाभूत सुविधांबाबत त्यांनी मांडलेली ठोस भूमिका तरुण मतदारांमध्ये लोकप्रिय ठरत आहे.

शिरुर ग्रामीण गणाच्या उमेदवार स्वाती घावटे यापुर्वी शिरुर ग्रामीणच्या सरपंच म्हणून काम केलेले आहे. सामाजिक कार्यातून पुढे आलेल्या उमेदवार म्हणून त्या ओळखल्या जात असून, त्यांच्या कामाचा थेट अनुभव असलेल्या नागरिकांकडून त्यांना भरघोस प्रतिसाद मिळत आहे. शिक्षण, आरोग्य व सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर त्यांनी सातत्याने आवाज उठविल्यामुळे त्यांची विश्वासार्हता अधिक बळकट झाली आहे.

सध्या प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात हि लढत अधिक चुरशीची होत असली, तरी तिन्ही उमेदवारांना मिळणारा वाढता जनाधार पाहता शिरूर ग्रामीण–न्हावरे जिल्हा परिषद गटात समीकरणे बदलण्याची दाट शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. आगामी निकालात मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती

शिरूर! जिल्हा परिषद गट टाकळी हाजीत कोणता पक्ष ठरणार श्रेष्ठ …

शिरूरमध्ये अनपेक्षित राजकीय उलथापालथ; राजकीय गणितांना मोठा धक्का…

जिल्हा परिषद अपडेट! ज्योती मानसिंग पाचुंदकर यांची प्रचारात जोरदार आघाडी!

Video; शिरुरमध्ये सुडाच्या राजकारणामुळे कार्यकर्त्यांचा संयम संपला; शेखर पाचुंदकर

शिरूर तालुका टीम

Recent Posts

श्री महागणपतीच्या दर्शन व्यवस्थेवर भाविकांचा संताप; ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमधील समन्वयाचा अभाव चव्हाट्यावर

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : ‘देवाच्या दारी सर्व भक्त समान’ असा संदेश समाजाला देणाऱ्या धार्मिक…

16 तास ago

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

4 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

4 दिवस ago