शिरूर तालुक्यात ७ जिल्हा परिषद, १४ पंचायत समिती जागांसाठी थेट, चौरंगी व पंचरंगी लढती

मुख्य बातम्या शिरूर तालुका

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनी अंतिम टप्प्यात कमालीची राजकीय रंगत घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी चित्र स्पष्ट झाले असून जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २० उमेदवार तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी तब्बल ४६ उमेदवार निवडणूक रिंगणात कायम राहिले आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यात यंदा थेट लढतींसह चौरंगी व पंचरंगी संघर्ष पाहायला मिळणार आहे.

तालुक्यातील काही गट व गणांमध्ये भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात थेट लढत होत असताना, अनेक ठिकाणी भाजप, राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना व अपक्ष अशा पंचरंगी लढतींमुळे निवडणूक अधिकच चुरशीची बनली आहे.

अर्ज मागे घेण्यामुळे समीकरणे बदलली

अर्ज माघारीच्या प्रक्रियेत काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या.

शिरूर-न्हावरा जिल्हा परिषद गटातून शिवसेना (शिंदे गट)च्या तृप्ती सरोदे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला.

शिक्रापूर जिल्हा परिषद गटात भाजपच्या उमेदवार कुसुम खैरे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्या अपक्ष उमेदवार कुसुम मांढरे यांनी माघार घेतल्याने या गटात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी सभापती मोनिका हरगुडे विरुद्ध अपक्ष अशी थेट लढत निश्चित झाली आहे.

मांडवगण फराटा गटात चौरंगी रणसंग्राम

मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते दादापाटील फराटे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे.स्वाभिमानी विकास आघाडीने जिल्हा परिषद व दोन्ही पंचायत समिती गणात उमेदवार उभे केल्यामुळे या गटात भाजप, राष्ट्रवादी, स्वाभिमानी विकास आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) अशी चौरंगी लढत अटळ ठरली आहे.

माजी आमदारांच्या कुटुंबांची प्रतिष्ठा पणाला

या निवडणुकीत माजी आमदारांच्या कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.दि वंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या पत्नी मालतीताई बाबुराव पाचर्णे शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उमेदवार आहेत.

मांडवगण फराटा जिल्हा परिषद गटातून माजी आमदार अशोक पवार यांच्या पत्नी, माजी जिल्हा परिषद सभापती सुजाता अशोक पवार राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत.

माजी आमदार पोपटराव गावडे यांचे पुत्र राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून टाकळी हाजी जिल्हा परिषद गटातून उमेदवारी केली आहे.या तिन्ही माजी आमदारांच्या राजकीय वारशाची खरी कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.

मतदानाकडे सर्वांचे लक्ष

काही ठिकाणी थेट लढती, बहुरंगी संघर्ष, माजी आमदारांची प्रतिष्ठा आणि स्थानिक नेतृत्व यामुळे शिरूर तालुक्यातील ही निवडणूक राजकीयदृष्ट्या अत्यंत निर्णायक ठरणार आहे. कोण बाजी मारणार, कोणाला पराभव स्वीकारावा लागणार, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद व पंचायत समिती गट निहाय उमेदवार पुढीलप्रमाणे….

शिरूर ग्रामीण जिल्हा परिषद गट 

वृषाली बबन वाळके ( राष्ट्रवादी काँग्रेस )

मालतीताई बाबुराव पाचर्णे ( भाजप )

शिरूर पंचायत समिती गण

स्वाती घावटे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) उज्ज्वला भोस ( भाजप )

न्हावरा पंचायत समिती गण 

दिपक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस )

सागर खंडागळे ( भाजप )

रांजणगाव गणपती जिल्हा परिषद गट ज्योती मानसिंग पाचुंदकर ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 

स्वाती दत्तात्रय पाचुंदकर (भाजप )

रांजणगाव पंचायत समिती गण

महेश फंड ( राष्ट्रवादी काँग्रेस )

सागर देवकर ( भाजप )

संदीप सोनवणे ( अपक्ष )

कारेगाव-कान्हूर मेसाई गण 

निर्मला नवले ( राष्ट्रवादी काँग्रेस )

मनीषा पाचंगे ( भाजप )

अक्षय नाणेकर ( राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार )

मांडवगण फराटा जिल्हा परिषद गट सुजाता अशोक पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस ) मच्छिंद्र गदादे ( शिवसेना ठाकरे गट )

सचिन शेलार ( भाजप )

दादासाहेब फराटे ( अपक्ष )

मांडवगण फराटा पंचायत समिती गण संगीता फराटे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) 

शोभा वराळे ( भाजप )

स्वाती मचाले ( शिवसेना ठाकरे )

दिपाली नागवडे ( अपक्ष )

वडगाव रासाई पंचायत समिती गण विकास शेलार (राष्ट्रवादी काँग्रेस) पोपटराव शेलार ( शिवसेना ठाकरे गट ) माऊली पाटोळे ( भाजप ) 

रणजित पाडळे ( अपक्ष )

विजेंद्र गद्रे ( अपक्ष )

संतोष पटेकर ( अपक्ष )

नानासाहेब सोनवणे ( अपक्ष )

टाकळी हाजी- कवठे येमाई जिल्हा परिषद गट 

दामू धोंडिबा घोडे (राष्ट्रवादी काँग्रेस ) राजेंद्र गावडे ( भाजप )

सुभाष पोकळे (शिवसेना शिंदे गट )

बाळासाहेब डांगे ( शिवसेना ठाकरे गट )

टाकळी हाजी पंचायत समिती गण संगीता दाभाडे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सुनिता कड (भाजप ) 

प्रगती निचित ( शिवसेना शिंदे गट ) पवित्रा शेलार ( शिवसेना ठाकरे गट )

कवठे येमाई पंचायत समिती गण 

शिल्पा अतुल थोरात ( राष्ट्रवादी काँग्रेस ) माधुरी थोरात ( शिवसेना शिंदे गट ) जयश्री लंघे ( शिवसेना ठाकरे गट )

कांचन सांडभोर ( भाजप )

तळेगाव-रांजणगाव सांडस जिल्हा परिषद गट 

रेखा मंगलदास बांदल ( राष्ट्रवादी काँग्रेस ) सारिका करपे (शिवसेना शिंदे)

दिपाली गव्हाणे (भाजप )

रेश्मा जयेश शिंदे ( अपक्ष )

तळेगाव पंचायत समिती गण

शोभा महेश ढमढेरे ( राष्ट्रवादी काँग्रेस )विद्या राजेंद्र भुजबळ ( भाजप )

चेतना ढमढेरे ( शिवसेना शिंदे गट )

रांजणगाव सांडस गण –

विजय रणसिंग ( राष्ट्रवादी काँग्रेस )

राहुल रणदिवे ( शिवसेना शिंदे गट ) हनुमंत काळे ( भाजप )

राजेंद्र पवार ( अपक्ष )

शिक्रापूर सणसवाडी जिल्हा परिषद गट मोनिका हरगुडे ( राष्ट्रवादी काँगेस ) 

सीमा कळमकर ( अपक्ष )

शिक्रापुर पंचायत समिती गण

रामभाऊ सासवडे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) पंढरीनाथ गायकवाड (भाजप)

सणसवाडी पंचायत समिती गण 

मनीषा संपत गव्हाणे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) कोमल ढेरंगे ( अपक्ष )

मीना ढेरंगे (अपक्ष)

पाबळ केंदूर जिल्हा परिषद गट 

प्रफुल्ल शिवले ( राष्ट्रवादी काँग्रेस ) विकास गायकवाड ( भाजप )

पाबळ पंचायत समिती गण

वंदना प्रकाश पवार ( राष्ट्रवादी काँग्रेस) दीपक खैरे ( भाजप )

केंदूर पंचायत समिती गण

सुचेता रोहन थिटे ( राष्ट्रवादी काँग्रेस ) आशा साकोरे ( भाजप )

मनीषा भंवार ( बसपा )