कारेगाव (तेजस फडके) येथील साईनगर परिसरातील पाण्याच्या प्लॅन्टमध्ये काम करणाऱ्या हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात गोळी झाडून करण्यात आलेल्या खुनाचा पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि रांजणगाव पोलिसांनी छडा लावला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पाण्याच्या प्लॅन्टच्या मालकाला संपविण्यासाठी सुपारी देऊन आखलेल्या कटात मारेकऱ्यांनी मालक समजून त्याच्याच कामगाराचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून, आणखी दोघांचा शोध सुरू आहे.
या प्रकरणी रांजणगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता तसेच शस्त्र अधिनियम कलमाच्या अन्वये गुन्हा दाखल आहे. फिर्यादी सौ. अबिताबी हामजा शेख (वय ३७), व्यवसाय नोकरी, सध्या कारेगाव, साईनगर येथे भाड्याने राहत असून मूळ गाव धानोरा काळे, ता. पूर्णा, जि. परभणी आहे. त्यांचे पती हामजा उस्मान शेख (वय ३९) हे नेहमीप्रमाणे कारेगाव येथील साईनगरमधील विकास नवले यांच्या इमारतीलगत असलेल्या ‘समु इंटरप्रायजेस अॅक्वा रिच’ या पाण्याच्या प्लॅन्टमध्ये कामावर गेले होते. त्यावेळी अज्ञात व्यक्तीने त्यांच्या डोक्यात गोळी झाडून त्यांचा खून केला.
या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखा व रांजणगाव पोलिसांना गुन्हा तातडीने उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार दोन्ही पथकांनी समांतर तपास सुरु केला.
सदरचे घटनास्थळ तसेच घटनास्थळाकडे येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी सार्थक संदेश कोहकडे (२४, रा. कारेगाव), तुषार अजय तोडकर (२६, रा. पेठ, ता. आंबेगाव), संतोष मधुकर मांजरे (३७, रा. मांजरेवस्ती, ता. खेड), विठ्ठल नवनाथ पिकळे (२७, रा. कोरेगाव, ता. खेड) आणि योगेश विलास इडोळे (२८, रा. शुक्रवार पेठ, वाशीम) यांना ताब्यात घेतले.
पोलिसांच्या चौकशीत खुनामागील धक्कादायक कट समोर आला. सार्थक कोहकडे आणि विकास नवले यांच्यात जागेवरुन वाद होता. या वादातून सार्थकने विकास नवले यांचा खून करण्यासाठी तुषार तोडकरला सुपारी दिली. तुषारने पुढे पिंपरी-चिंचवड येथील सराईत तडीपार गुन्हेगार संतोष मांजरे याला सुपारी दिली. त्यानंतर संतोष मांजरे याने पवन सुरेश हुंडारे, पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव, विठ्ठल पिकळे आणि योगेश इडोळे यांच्या साथीने विकास नवले यांचा खून करण्याचा कट रचल्याचे तपासात समोर आले.
मात्र, आखलेल्या कटात मोठी चूक झाली. मारेकऱ्यांनी विकास नवले समजून त्यांचा कामगार हामजा उस्मान शेख यांच्या डोक्यात गोळी झाडली आणि त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील पवन सुरेश हुंडारे आणि पृथ्वी ऊर्फ भैय्या दत्तू जाधव हे अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत.
सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ शुभम कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी रविंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कुमार कदम, सहायक पोलिस निरीक्षक महादेव शेलार, अनिल मोरडे, पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, निळकंठ तिडके, अविनाश थोरात, दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने केली.
या कारवाईत पोलीस अंमलदार शरद बांबळे, संजय पड्याळ, दीपक साबळे, तुषार पंदारे, जनार्दन शेळके, संजू जाधव, राजू मोमीन, विकास पाटील, सागर धुमाळ, संदीप फड, स्वप्नील गाढवे, हनुमंत ढोबळे, संदीप वारे, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, अतुल डेरे, चेतन पाटील, भारत मोहोळ, विलास आंबेकर, उमेश कुतवळ, योगेश गुंड, रासकर, शिवणकर, संतोष साळुंखे, दत्तात्रय शिंदे तसेच खेड पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार संकेत कवडे यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास रांजणगाव MIDC पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम हे करत आहेत.
(क्रमश:)
शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यात दुष्काळ जाहीर झाल्यानंतर पीक नुकसानीची पाहणी करण्याचे काम सुरू…
शिरुर (तेजस फडके) ‘तुमच्याकडील सोन्यापेक्षा हे बिस्कीट अधिक वजनाचे आहे,’ असे भासवून महिलेचा विश्वास संपादन…
मुंबई: देशाच्या प्रगतीमध्ये सहकार क्षेत्राचे मोठे योगदान आहे. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू…
राजन पारकर यांची भूमिका; ज्येष्ठ पत्रकारांचा आधार काढून घेण्याऐवजी योजनेतील त्रुटी दूर करण्याची मागणी सध्या…
मुंबई : पोलीस दलात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगून तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील हजारो युवक-युवतींना मार्गदर्शन…
संघर्ष, संघटन आणि जनसंपर्काच्या बळावर राजकीय वाटचाल; नगरसेवक ते उपमुख्यमंत्री असा प्रवास मुंबई : महाराष्ट्राच्या…