शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुका बांधकाम कामगार संघटनेच्या शिवसेना प्रणित शिरुर तालुका बांधकाम सेनाप्रमुख या पदावर संदीप शेलार यांची नियुक्ती करण्यात आली. शिरुर तालुक्यातील रिक्त जागेवरती महाराष्ट्राचेमाजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व पुणे जिल्हा बांधकाम कामगार सेना प्रमुख संतोष राजपूत यांच्या नियुक्तीने महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत गोगावले व विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते व शिरुर महिला लोकसभा संपर्कप्रमुख सारिका पवार यांच्या मार्गदर्शनाने ही नियुक्ती देण्यात आली.
या निवडीनंतर बोलताना संदीप शेलार यांनी सांगितले की, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि दिवंगत धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण यांचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार करणार आहे. या निवडीच्या वेळेस पुणे शिवसेनेतील सर्व संपर्कप्रमुख नगरसेवक पदाधिकारी उपस्थित होते.
शिरुर तालुक्यात ६० हजारांची लाच घेतल्याने लाचलुचपत विभागाची ग्रामसेवक महिलेवर कारवाई
शिरुर; चार वर्षात सरपंच फक्त नामधारी ग्रामपंचायतच्या प्रत्येक निर्णयामध्ये त्या महाशयांचीचं लुडबुड…?
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…