मुख्य बातम्या

शेतकऱ्यांबाबतच्या अवमानकारक वक्तव्यावरून शिवसेनेचा कृषिमंत्र्यांना इशारा; कोकाटेंना शिरूरमध्ये फिरू देणार नाही

शिरूर (अरूणकुमार मोटे): “शेतकऱ्यांना कर्जमाफी साखरपुडा आणि लग्नासाठी हवी असते” असे विधान करून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांचा अपमान केला असून, या वक्तव्याचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या भावना दुखावणाऱ्या कोकाटे यांना शिरूर तालुक्यात प्रवेश करण्यास परवानगी दिली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा तालुकाप्रमुख पोपट शेलार यांनी दिला. या निषेध आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाप्रमुख अशोक खांडेभराड यांनी केले असून, जिल्हा संपर्कप्रमुख आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येणार आहे.

दरम्यान, शेलार यांनी ‘साकळाई उपसा जलसिंचन पाणी योजना’ रद्द करण्याची मागणीही केली आहे. घोड धरणातून अहमदनगर जिल्ह्यातील ३२ गावांना १.८ टीएमसी पाणी देण्याच्या या योजनेमुळे शिरूर तालुक्यातील शेती आणि रांजणगाव एमआयडीसीवर पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

शिरसगाव काटा, निर्वी, चिंचणी, शिंदोडी, गुनाट, निमोणे, गोलेगाव, तर्डोबाची वाडी आदी गावांमध्ये आधीच पाणीटंचाई आहे. उन्हाळ्यात या भागांमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होते, त्यामुळे या योजनेमुळे स्थानिक शेतकरी अधिक अडचणीत येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील भाष्य करणाऱ्या मंत्री कोकाटे यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशीही मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अळीवचे आरोग्यदायी फायदे

अळीवमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत होते. महिलांना मासिक पाळीच्या काळात किंवा…

21 मिनिटे ago

केस गळतीवर घरगुती उपाय

1) केस गळणे ही सौंदर्य बिघडविणारी सर्वात मोठी समस्या आहे. केस गळणे थांबवून ते पुन्हा…

24 मिनिटे ago

डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची लढाई पुढे नेणे हीच खरी आदरांजली; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत आणि युवक क्रांती दलाचे संस्थापक डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या विचारांची…

27 मिनिटे ago

Video: रांजणगाव MIDC तील कंपनीत टेम्पो आणि रॅम्पमध्ये चेंगरून चालकाचा मृत्यू…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : कंपनीत माल पोहोचविण्यासाठी आलेल्या टेम्पोच्या मागील बाजूचा पडदा बांधत असताना…

12 तास ago

शिरूर! पिंपळे जगताप पाझर तलावातील खुनाचा तीन दिवसांत छडा; तिघांना अटक; कारण उघड…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे) : पिंपळे जगताप येथील पाझर तलावात आढळलेल्या अज्ञात युवकाच्या खुनाचा शिक्रापूर पोलिसांनी…

16 तास ago

‘स्मार्ट मीटर’वरून पुन्हा वाद; ग्राहकांचे प्रश्न, पारदर्शकतेची मागणी

वीजबिल, माहितीचा अधिकार आणि तक्रार निवारणावर 'स्टेट ड्राईव्ह'मधून उपस्थित झाले प्रश्न मुंबई: राज्यात स्मार्ट मीटरच्या…

17 तास ago