मुख्य बातम्या

उरळगाव येथे ऊस पिक परिसंवादाचे कृषी विभाग व ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

न्हावरे (तेजस फडके) महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि ग्रामपंचायत कार्यालय उरळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस पिक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या परिसंवादात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. संदीप घोले, राजेश थोरात आणि योगेश गाडे उपस्थित होते.

डॉ. घोले यांनी ऊस लागवडीत वापरल्या जाणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती दिली. त्यांनी तण नियंत्रण, हुमणी नियंत्रण, पाचट व्यवस्थापन, जमिनीच्या सुपिकतेनुसार खत व्यवस्थापन आणि निविष्टांचा योग्य वापर याबाबत सखोल मार्गदर्शन केले. राजेश थोरात यांनी “एकरी खर्च कसा कमी करावा” याबाबत शेतकऱ्यांना उपयुक्त टिप्स दिल्या. तर योगेश गाडे यांनी एक डोळा ऊस लागवड तसेच कांदा रोपवाटिका संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले.

तसेच मंडळ कृषी अधिकारी कांतीलाल वीर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. कृषी क्षेत्रात एआय (AI) चा वाढता उपयोग आणि त्याचे भविष्यातील महत्त्व यावरही परिसंवादात चर्चा झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच स्वप्निल गिरमकर होते.

यावेळी सचिन पाचुंदकर, संतोष सात्रस, अशोक कोळपे, राजेंद्र गिरमकर, पोपट गिरमकर, सोमनाथ बांडे, मोहन सात्रस, सागर गिरमकर, बापू कोळपे, उप कृषी अधिकारी शिवाजी गोरे, सहायक कृषी अधिकारी संतोष गदादे, विशाल भोसले, योगेश गाडे (गुनाट), प्रफुल्ल सोनवणे (निर्वी), सेवा निवृत्त कृषी अधिकारी कैलास सात्रस आदी मान्यवर उपस्थित होते.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सरपंच स्वप्निल गिरमकर, पोपट कुदळे, तात्या सात्रस आणि जयवंत भगत (सहायक कृषी अधिकारी) यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत भगत यांनी केले तर आभार राजेंद्र गिरमकर यांनी मानले.

Video; शेतात जायला रस्ताच नसल्याने पाच एकर द्राक्षबाग तोडण्याचा शेतकऱ्याचा टोकाचा निर्णय

उल्लेखनीय; महिलांचे मंगळसूत्र हिसकावणाऱ्या एका अट्टल चोराला अटक १० लाखांचे सोने हस्तगत

न्हावरा फाटा व सतरा कमान चौक येथे सौर ऊर्जेवर चालणारे सिग्नल बसवले

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

पिंपरखेडमध्ये शिव पाणंद शेत रस्ते चळवळीच्या समन्वयाने शेतरस्ता खुला

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर. तालुक्यातील पिंपरखेड येथील बोंबे वस्तीवर जाणारा शेतरस्ता दीड वर्षांपासून वादग्रस्त ठरला…

15 तास ago

शिरुर तालुक्यात कंपनीतुन तब्बल १६ लाखांची कॉपर ट्यूब चोरी; औद्योगिक सुरक्षेवर प्रश्नचिन्ह…?

न्हावरे (अक्षय टेमगिरे) शिरुर तालुक्यातील करडे हद्दीत असलेल्या एस. व्ही. एस. रेफकॉम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून…

16 तास ago

कारेगावात “शिवतीर्थ प्रतिष्ठान” तर्फे भव्य सार्वजनिक नवरात्रोत्सव

रांजणगाव गणपती (तेजस फडके) कारेगाव (ता. शिरुर) येथे संस्कृती आणि कला यांचा संगम घडवणारा 'सार्वजनिक…

1 दिवस ago

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली.…

2 दिवस ago

सरकारच्या निष्क्रियतेमुळे तरुणांच्या आत्महत्या वाढत आहेत; ॲड. संग्राम शेवाळे

मुंबई (प्रतिनिधी) राज्यात दरवर्षी हजारो तरुण आत्महत्या करत आहेत. हि केवळ आकड्यांची बाब नाही, तर…

2 दिवस ago

शिरुर तालुक्यात प्रशासनाकडुन गोपनीयता फाट्यावर; तक्रारदारचं असुरक्षित…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात तहसिल प्रशासनाची बेपर्वाई आणि निष्काळजीपणा वेळोवेळी उघड होत असुन तक्रारदाराने…

3 दिवस ago