मुख्य बातम्या

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने सुनंदा लंघे यांना सन २०२५ चा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सावित्रीच्या लेकी आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.त्यांचे हे समाजकार्य अविरत चालु रहावे. तसेच त्यांची प्रेरणा इतर महिला शिक्षकांना मिळावी म्हणून ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५’ देण्यात आला. यावेळी एक महिला शिक्षिका करत असलेल्या चांगल्या कार्यास अजुन प्रेरणा मिळावी म्हणून हा पुरस्कार देण्यात आल्याचे रामलिंग महिला उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राणी कर्डीले यांनी सांगितले.

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच इतर वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना विविध पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला जातो. त्याचप्रमाणे शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या,सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या व्यक्तीस दरवर्षी ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुरस्काराने त्यांचा सन्मान केला जातो. सन्मानचिन्ह व शाल असे या पुरस्काराचे स्वरुप असते.

 

या कार्यक्रमाचे आयोजन शिरुर येथील ज्ञानगंगा शाळा बाबुरावनगर येथे करण्यात आले होते. यावेळी प्रथम ‘क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले’ यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व शाल देऊन सन्मानित करण्यात आले. ज्ञानगंगा शाळेच्या सर्वेसर्वा अमृता घावटे, घावटे सर, डॉ वैशाली साखरे, डॉ स्मिता कवाद, गिता आढाव ,इतर सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते. यावेळी उपस्थित सर्वांचे आभार संस्थेच्या वतीने राणी कर्डिले यांनी मानले.

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने दिव्यांग दिनानिमित्त तालुका स्तरीय प्रेरणा पुरस्कार वितरण

शिरुर ST बस स्थानकातील अस्वच्छ शौचालयाबाबत रामलिंग महिला उन्नतीचे निवेदन; मागण्या मान्य न झाल्यास उपोषण

शिरुर तालुका डॉट कॉम व रामलिंग महिला उन्नती च्या घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे बक्षीस वितरण

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video! शिरूर शहरात पहाटे गोळीबार; तरुणाचा मृत्यू…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर शहरातील लाटेआळी आंबेडकर नगर परिसरात आज (शुक्रवार) सकाळी साडेसहाच्या सुमारास…

7 तास ago

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

1 दिवस ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

1 दिवस ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

1 दिवस ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

1 दिवस ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

1 दिवस ago