मुख्य बातम्या

‘कानुन के हात लंबे होते है’ लेकिन कभी कभी ‘राजनेताओ’ के वजह से बंधे होते है…?

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणातुन होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर शिरुर पोलिस व महसुल विभागाने रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुनाट (ता. शिरुर) येथे संयुक्त कारवाई केली. परंतु पोलिस पथक तसेच महसुल विभागाचे सात ते आठ कर्मचारी कारवाईसाठी आलेले असतानाही कारवाई दरम्यान संबंधित हायवा चालक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन ‘सिनेस्टाईल’ पद्धतीने पळुन गेल्याने वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे.

त्यानंतर वेगवेगळ्या प्रसार माध्यमात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर गुनाट येथे शिरुर पोलिस व महसूल प्रशासनाच्या संयुक्त कारवाईत बेकायदा वाळू वाहतूक करणाऱ्या व जप्त केलेल्या दोन अज्ञात चालक व हायवा मालक यांच्याविरोधात शिरुर पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला. परंतु या कारवाई दरम्यान एका बड्या राजकीय नेत्याचा पोलिस आणि महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन आल्यानेच ‘कानुन के हात लंबे होते है’ लेकिन कभी कभी ‘राजनेताओंके’ वजह से बंधे होते है…? या म्हणीप्रमाणे कारवाई करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी ‘कचखाऊ’ भुमिका घेतल्याची सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

या कारवाईत सात ते आठ शासकीय कर्मचारी सोबत असतानाही दोन हायवा चालक पळुन जात असतील तर पोलिस आणि महसुल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे. हायवा क्रं (एम.एच. १२ डब्ल्यू.एक्स. ६१९९) आणि हायवा क्रं (एम.एच. १२ पी. क्यू. ००९९) या दोन वाहनावरील अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्याची नामुष्की शिरुर पोलिसांवर ओढवल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हि दोन वाहने सध्या ताब्यात घेण्यात आली आहेत.

 

या कारवाईत नायब तहसीलदार विजय कौलवकर,पोलीस अंमलदार नाथाभाऊ जगताप, नितेश थोरात, तलाठी सुनील पडवळ, कोतवाल अर्जुन वाघमारे यांच्या पथकाने केली. तर पोलिस अंमलदार सचिन भोई यांनी वाळूचोरीबाबत फिर्याद दिली असुन पुढील तपास पोलिस अंमलदार शुभम चव्हाण करत हे आहेत.

 

वाळुच्या कारवाईचा व्हिडिओ व्हायरल अन चर्चांना उधाण…

रविवार (दि २९) रोजी अवैध वाळू वाहतुकीवर पोलिस आणि महसूल विभागाने पहाटे कारवाई केल्यानंतर काही जागरुक नागरीकांनी कारवाई केलेल्या हायवाचे व्हिडिओ काढुन ते सोशल मिडीयावर व्हायरल केले. त्यामध्ये हायवा वाळूने पुर्ण भरलेला दिसत आहे. जाणकारांच्या मते व्हिडिओ मध्ये दिसणाऱ्या पकडलेल्या हायवामध्ये अंदाजे ६ ब्रास वाळू असावी परंतु पंचनामा करताना एका हायवा मध्ये ४ ब्रास वाळू असल्याचे नमुद करण्यात आले आहे. त्यामुळे हायवा मध्ये जास्त वाळू असताना कमी वाळूचा पंचनामा करण्यात आला तर नाही ना…? अशी शंका सर्वसामान्य नागरीक उपस्थित करत आहेत.

 

वाळू माफियांचे स्टेटस अन हतबल प्रशासन…

चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या सहा महिन्यापासुन रात्रीच्या वेळेस बेकायदेशीरीत्या अवैध वाळू उपसा चालु आहे. अनेक वाळू माफीयांच्या सोशल मिडीयावर वाळूच्या हायवा खाली करतानाचे स्टेटस टाकलेले असतात. तरीही महसुल आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत दोन हायवा चालक पळुन गेल्यानंतर ‘अज्ञात’ व्यक्ती विरोधात प्रशासनातील अधिकारी गुन्हा दाखल करत असतील तर वाळू माफियांना वाचविणारा तो राजकीय बडा नेता नक्की कोण आहे…? आणि शासनाचा लाखों रुपयांचा महसूल बुडत असतानाही वाळू माफियांवर कारवाई करत असताना जर राजकीय हस्तक्षेप होत असेल तर थोड्याच दिवसात शिरुर तालुक्यात ‘कायदा आणि सुव्यवस्था’ धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही अशीही सगळीकडे दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

(क्रमश:) 

शिरुर तालुक्यात अवैध वाळु उपशामुळे कायदा आणि सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता…?

घोड धरणातील अवैध वाळू उपशावर महसुल आणि पोलिसांची संयुक्त कारवाई

श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा तालुक्यात वाळु माफियावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात सर्वसामान्य दहशतीत, गुन्हेगार मोकाट; ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे केवळ ब्रीदवाक्यचं राहणार का…?

शिरूर (तेजस फडके) : महाराष्ट्र पोलिसांचे ‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य म्हणजे 'सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांचा…

1 तास ago

दारू प्यायची आहे…? चला किराणा दुकानात! शिरूर पोलिसांच्या हद्दीत गावठी दारूची खुलेआम विक्री…

शिरूर (तेजस फडके) : किराणा मालाच्या दुकानात सर्वसामान्यपणे धान्य, तेल, साखर, चहा, साबण आणि दैनंदिन…

2 तास ago

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस उत्साहवर्धक राहील. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. व्यवस्थापकीय कौशल्यामुळे वरिष्ठांचे कौतुक…

5 तास ago

विश्वासाशिवाय कॉरिडॉर नाही; विकासासोबत वारकऱ्यांची सेवा आणि शेतकऱ्यांचा सन्मान; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंढरपूर: आषाढी एकादशीच्या पावन सोहळ्यानिमित्त पंढरपुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूर कॉरिडॉर, शक्तिपीठ महामार्ग, वारकरी…

5 तास ago

आषाढी वारीसाठी सरकार सज्ज! पंढरपूर विकासासाठी ६७१ कोटी; एअर ॲम्बुलन्स, NDRF, CCTVसह चोख नियोजन

पंढरपूर: आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षित, आरोग्यदायी आणि सुरळीत दर्शनासाठी राज्य सरकारने सर्व यंत्रणा…

5 तास ago

शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिड महिन्यात दुसऱ्यांदा गोळीबार; पोलिसांचा धाक संपलाय का…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील करडे परिसरात अवघ्या दिड महिन्याच्या कालावधीत गोळीबाराच्या दोन…

1 दिवस ago