मुख्य बातम्या

तळेगाव ढमढेरेत व्याजाच्या पैशासाठी फळ विक्रेत्याचे अपहरण

शिक्रापूर (शेरखान शेख) तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका फळ विक्रेत्यास व्याजाने पैसे देऊन व्याजाचे पैसे दिले नाही म्हणून फळ विक्रेत्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली असुन याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अनिल ढमढेरे या इसमावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

ranjangaon-mutadwar-darshan

तळेगाव ढमढेरे येथील वसीम बागवान या फळविक्रेत्याने गावातील अनिल ढमढेरे या इसमाकडून 1लाख 90 हजार रुपये घेतले होते. सदर पैशाच्या बदल्यात प्रत्येक आठवड्यात 19 हजार रुपये असे 15 हप्ते देण्याचे ठरले होते. बागवान यांनी 9 हप्ते पैसे दिले. त्यांनतर पैसे देण्यास विलंब झाल्याने अनिल ढमढेरे बागवान यांना वारंवार फोन करुन पैशाची मागणी करत होता. त्यांनतर २३ ऑगस्ट रोजी अनिल हा त्याच्या एम एच १२ ६४७७ या फॉरच्यूनर कार मधून बागवान याच्या घरी गेला आणि वसीमकडे पैशाची मागणी करु लागला यावेळी अनिल याने माझे व्याजाचे 1 लाख रुपये राहिले आहेत ते मला दे नाहीतर तुला दाखवतोच अशी धमकी दिली. त्यांनतर तो वसीम याला त्याच्या फॉरच्यूनर कार मध्ये बसवून घेऊन गेला.

त्यांनतर वसीम घरी परतलाच नाही किंवा त्याच्याशी संपर्कही झाला नाही. तसेच वसीम याची पत्नी व भावाने अनिल याला फोन केला असता त्याने देखील फोन उचलले नाहीत. तसेच बागवान यांनी त्यांच्या नातेवाईकांसह अनेक ठिकाणी वसीमचा शोध घेतला. मात्र तो कुठच मिळून आला नाही. याबाबत निलोफर वासिम बागवान (वय ३६) रा. शिक्षक भवन जवळ, तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असल्याने शिक्रापूर पोलिसांनी अनिल ढमढेरे ( पूर्ण नाव नाही ) रा. तळेगाव ढमढेरे ता. शिरुर जि. पुणे या सावकारावर गुन्हे दाखल केले असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव स्वामी हे करत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

भिक्षा देण्यास नकार दिल्याने महिलेवर हल्ला; भिकाऱ्याने नाकाला घेतला चावा

मथुरा : गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घालत असलेल्या एका महिलेने भिक्षा देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या भिकाऱ्याने…

14 तास ago

तोंडाला सतत दुर्गंधी येते, दातांना कीड लागते, पाहा ‘असं’ का होत

रोज करायचे काय दिवसातून दोनदा दात घासा. सकाळी आणि रात्री. यामुळे दातांमध्ये काही अडकून राहणार…

14 तास ago

तापमान वाढीमुळे बंद पडू शकतं तुमचं हृदय, वाचा हार्ट अटॅकचा धोका जास्त कुणाला

वाढत्या तापमानाचा हृदयावर प्रभाव  हीटवेव किंवा जास्त तापमानामुळे कार्डिओवस्कुलर सिस्टीमवर प्रभाव पडतो, ज्यामुळे हार्ट अटॅकचा…

14 तास ago

गव्हाच्या पिठामध्ये ‘या’ ५ गोष्टी मिसळा आरोग्य राहिल निरोगी

अनेक भारतीय पदार्थांमध्ये गव्हाच्या पीठचा वापर केला जातो. गव्हाच्या पीठपासून चपाती किंवा मिठाई असे अनेक…

14 तास ago

नितीन नबीन यांची सुनेत्रा पवार यांची सदिच्छा भेट; महाराष्ट्रातील विकासकामांवर चर्चा

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांनी बुधवारी मुंबईतील देवगिरी या शासकीय निवासस्थानी…

14 तास ago

‘पंचनाम्यांची वाट कसली पाहता?’ दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या; वडेट्टीवारांचा सरकारवर निशाणा

नागपूर: महाराष्ट्रातील दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत असून सोयाबीनचे पीक हातचे गेले आहे, तर अनेक…

14 तास ago