मुख्य बातम्या

शिरूरमधील राजकारण तापलं! आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांना फटकारलं…

शिरूर (तेजस फडके) : शिरुरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला चांगलाच वेग येऊ लागला असून, राजकीय वातावरण तापू लागले आहे. यामुळे शिरूर लोकसभा मतदार संघात चर्चांना उधाण येऊ लागले आहे.

मविआतर्फे विद्यामान खासदार अमोल कोल्हे तर महायुतीतर्फे शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट देण्यात आले आहे. दोन्ही नेते आता पूर्ण ताकदीने प्रचाराला लागले आहेत. अमोल कोल्हे यांनी दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी वधू-वरांना आशीर्वाद देताना कोल्हे यांनी काही राजकीय स्वरुपाची विधानं केली होती. त्यांच्या याच विधानांनंतर शिवाजीराव आढळराव पाटील आक्रमक झाले आहेत.

अमोल कोल्हे 31 मार्च रोजी मोहिते पाटील यांच्या पुतणीच्या लग्नाला गेले होते. त्यांनी तेते राजकीय भाष्य केलं होतं. याच भाष्यानंतर आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मंगलमय प्रसंगी कोल्हे वाचाळवीरांसारखं बरळले. लग्न म्हणजे हा आनंदाचा प्रसंग असतो. त्यामुळे अशा ठिकाणी राजकारणाची भाषा करणं हे शोभत नाही. असे बोलून उपस्थित लोकांच्या टाळ्या घेता येतात. मात्र हे संस्कृतीत बसत नाही. अमोल कोल्हे यांना अशी शिकवण कोणी दिली हे सांगता येणार नाही. एखाद्याच्या लग्नाला जाऊन नम्रपणे त्यांना अभिवादन करांव. वधू-वरांना शुभेच्छा द्याव्यात. पण लग्नप्रसंगी जाऊन वाचाळवीरासारखं बरळायचं हे बरं वाटत नाही, असे आढळराव पाटील म्हणाले.

दरम्यान, अमोल कोल्हे यांनी आमदार दिलीप मोहिते यांच्या पुतणीच्या लग्नाला हजेरी लावली होती. लग्नसोहळ्याला येण्यासाठी कोल्हे यांना उशीर झाला होता. हाच सदर्भ घेत वधू-वरांना आशीर्वाद देताना ‘घड्याळ निघून गेल्याने वेळ जुळत नाहीये. पण पण वधू-वराच्या आयुष्यात सुखाची-समाधानाची तुतारी वाजावी’, असे अमोल कोल्हे म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची चांगलीच चर्चा झाली होती. आता आढळरावांनी लक्ष्य केल्यामुळे अमोल कोल्हे काय प्रत्युत्तर देणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभा निवडणूक! शिवाजीराव आढळराव पाटील की अमोल कोल्हे?

Video: शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या पाया पडले अमोल कोल्हे…

तिरंगी लढत! शिरूर लोकसभेच्या निवडणूकीत उतरले मंगलदास बांदल…

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

‘वोट के लिये कुछ भी करेगा’ अभिनेत्यांनाही लाजवेल असे नेत्यांचे अभिनय

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्ष आणि चिन्हही ठरले…

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

आढळराव पाटील आणि अजित पवार यांचा एकाच गाडीत प्रवास; चर्चांना उधाण…

अजित पवारांच्या टिकेनंतर अमोल कोल्हेंचा पलटवार, पक्षात येण्यासाठी लपून छपून भेटीगाठी कशाला घेतल्या…?

शिरुरच्या शेतकरी मेळाव्यात अजित पवारांची अमोल कोल्हेंवर टिका, तर अशोक पवारांबाबत सौम्य भुमिका

अमोल कोल्हे यांच्या सारखा सेलिब्रिटी उमेदवार देणं ही आमची चूक: अजित पवार

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

अजित पवार यांच्या चॅलेंजनंतर अमोल कोल्हे यांनी मानले आभार…

अजित पवार, अमोल कोल्हे यांच्यानंतर आढळराव पाटील म्हणाले…

अमोल कोल्हे यांचे नाव न घेता अजित पवार यांची जोरदार टीका केली; आता पाडणारच…

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अभियांत्रिकी-पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांसाठी AI कौशल्यविकासावर भर; रोजगाराच्या संधींसाठी केंद्रीकृत प्लेसमेंट प्लॅटफॉर्म

मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचा आता ऑनलाइन निपटारा; DBATUचे ‘Students Grievances Portal’ तातडीने सुरू करण्याचे निर्देश

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…

10 तास ago

विद्यार्थ्यांच्या कल्पनांना मिळणार ‘स्टार्टअप’ची ताकद! महाराष्ट्रात इन्क्युबेशन सेंटरचे जाळे उभारण्याच्या हालचालींना वेग

मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…

10 तास ago

गणेशोत्सवासाठी मुंबई सज्ज; सचिन अहिरांची पालिका अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक, विसर्जन व्यवस्थेवर विशेष भर

मुंबई : लाडक्या बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने मुंबईत गणेशोत्सवाची लगबग अंतिम टप्प्यात…

10 तास ago

लंडनच्या संसदेत ‘जय महाराष्ट्र’चा निनाद; एकनाथ शिंदेंना प्रतिष्ठेचा सन्मान

लंडन: ब्रिटनच्या संसद भवनातील वरिष्ठ सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये गुरुवारी ‘जय महाराष्ट्र’चा निनाद घुमला. महाराष्ट्राचे…

10 तास ago

शिरुर; सोन्याचा गंठण लाखोंचा; पण दळवी दांपत्याच्या मनाचा मोठेपणा मात्र करोडोंचा

शिरुर (तेजस फडके) सध्या सोन्याचा बाजार दिवसेंदिवस वाढत आहे. व्यक्तीला सोन खरेदी करणं सर्वसामान्य व्यक्तीच्या…

14 तास ago