Beaten

शिरूर तालुक्यात बिर्याणीच्या वादातून एकाला कोयत्याने मारहाण तर दुसऱ्याला…

क्राईम

कोरेगाव भीमा: कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे गाझी बिर्याणी दुकानातून पार्सल नेण्यासाठी आलेल्या दोन मित्रांना बिर्याणी संपली असल्याचे सांगणाऱ्या दुकानदाराला थोडी तरी बिर्याणी द्या अशी मागणी करत असताना झालेल्या वादातून शेजारी बसलेल्या एकाने वाद घातला. मित्राला घेऊन येत कोयत्याने व लोखंडी रॉडने मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

शिक्रापूर पोलिस स्टेशन येथे अतुल संजय मते (वय २४, कोरेगाव भीमा आदित्य पार्क) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार तक्रारदार शुभम रमेश उत्तेकर हा (रा.नक्षत्र सोसायटी, कोरेगाव भीमा) हे सोमवार २५ मार्च धुलीवंदनाच्या दिवशी रात्री १०.३० वाजणेचे सुमारास अतुल मते व शुभम उत्तेकर हे दोघे मित्र बिर्याणी पार्सल घेण्याकरीता गाझी केटरर्स, कोरेगाव भीमा या हॉटेलमध्ये गेले होते. तेथे बिर्याणी संपल्याचे हॉटेलमालकाने सांगितले असता त्याला आग्रह करून थोडीतरी बिर्याणी पार्सल द्या, असे म्हटले. परंतु, हॉटेल मालक तक्रारदार यांच्याशी हुज्जत घालून ‘बिर्याणी खतम होगई है, नही मिलेगी” असे म्हणाला. त्याचवेळी तेथे शेजारी असणारा एक जण आला त्याने ‘मी राम कांबळे आहे असे सांगत तुम्हाला एकदा सांगितलेले कळत नाही का?” असे म्हणुन राम कांबळे याने अतुल मते व मित्र शुभम उत्तेकर यांना शिवीगाळ करू लागला.

दरम्यान, दोघांनीही त्यास समजावनु सांगत “तु आमच्यामध्ये कशाला पडतो. तु इथुन निघुन जा” असे सांगितले. राम कांबळे हा तेथुन निघुन गेला व लगेबच हातामध्ये एक लोखंडी कोयता घेवून आला. त्याचे सोबत त्याचा भाऊ (नाव अज्ञात) व त्याचे हातामध्ये लोखंडी रॉड होता. त्यानंतर राम कांबळे याने त्याच्या हातामधील लोखंडी कोयता तक्रारदार अतुल मते याच्या डावे हातावर व पाठीवर मारून गंभीर दुखापत केल्याने डावे हातातुन व पाठीतुन रक्त यायला लागले. राम कांबळे याच्या भावाने शुभम उत्तेकर याच्या पाठीवर, उजव्या पायाच्या मांडीवर व दोन्ही पायांवर लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत केली. तक्रारदार व त्याचा मित्र कसेबसे त्यांच्या तावडीतून निसटून पळून गेले. त्यांनंतर वाघोली रुग्णालयात जाऊन औषधोपचार घेवून शिकापुर पोलिस स्टेशन येथे तकार दिली. याबाबत पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

ग्रामीण भागाचा बिहार होतो काय?
ग्रामीण भागात हे कोयत्याचे लोण पसरते की काय ? थोड्या वादावरून जर कोयत्याने मारहाण होत असेल तर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. पोलिस प्रशासनाने याबाबत कडक कारवाई करायला हवी जर याबाबतीत काहीच होत नाही? असा चुकीचा समज गुन्हेगारांमध्ये पसरला तर ग्रामीण भागाचा बिहार व्हायला वेळ लागणार नाही.

दिलीप वळसे पाटील यांचा अपघात, हात फ्रॅक्चर तर…

शिरुर; वाळू माफियांची महसुलच्या अधिकारी अन कर्मचाऱ्यांना नऊ बकऱ्यांची कंदुरी, पार्टीत दारु पिऊन अधिकारी झिंगाट

शिरुरमधील ‘त्या’ युवकाच्या आत्महत्येचे कारण आले समोर; प्रेमसंबंधातून मारहाण अन् गळफास…

रांजणगाव-बाभुळसर अष्टविनायक महामार्गावर अपघातात एका महिलेचा मृत्यू; वाहनचालक फरार

शिरुर तालुक्यात महसूल आणि पोलिसांचा वसुलीचा चाललाय खेळ; त्यामुळे वाळू माफियांचा बसलाय मेळ