मुख्य बातम्या

Video; घोडनदीवरील पुलाचा प्रश्न ऐरणीवर, चिंचणी–बोरी ग्रामस्थांचा जीव मुठीत घेऊन प्रवास

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी आणि श्रीगोंदा तालुक्यातील बोरी या दोन गावांना जोडणाऱ्या घोडनदीवर ७५ वर्षे होऊन अद्यापही दळणवळणासाठी कायमस्वरुपी पुल नाही. त्यामुळे ग्रामस्थांना रोज याठिकाणी प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरावा लागतो. पावसाळ्यात तर ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. घोड धरणातुन पाणी नदीपात्रात सोडल्यानंतर  या दोन्ही गावांमधील संपर्क पुर्णपणे तुटतो.

चिंचणी हे गाव शिरुर तालुका तसेच पुणे जिल्ह्याच्या पुर्व भागातील शेवटचं गाव आहे. तर बोरी हे श्रीगोंदा तालुका तसेच अहिल्यानगर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील शेवटचं गाव आहे. शिरुर तालुक्यातुन श्रीगोंदा तालुक्यात प्रवास करण्यासाठी जवळचा मार्ग आहे. दररोज या मार्गाने शाळकरी मुले, शेतकरी, कामगार आणि रुग्ण यांना प्रवास करावा लागतो. पण नदीतील खोल पाणी आणि पाण्याच्या वेगवान प्रवाहामुळे त्यांचा प्रवास अत्यंत जीवघेणा आणि धोकादायक ठरत आहे.

राजकीय अनास्था आणि हतबल ग्रामस्थ…

चिंचणी येथुन बोरी येथे जाण्यासाठी नदीपात्रातुन रस्ता आहे. मात्र नदीपात्रात खड्डे असल्यामुळे पाणी आल्यानंतर अनेकदा पाण्यातुन प्रवास करताना दुचाकी पाण्यात पडुन किरकोळ अपघात झाले आहेत. अनेकवेळा या दोन गावात ये-जा करण्यासाठी होडीचा वापर केला जातो. तरीही दोन्ही तालुक्याचे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडुन या प्रश्नाकडे वर्षानुवर्षे कानाडोळाच होत आहे, अशी तीव्र नाराजी चिंचणी आणि बोरी या दोन्ही गावच्या ग्रामस्थांची व्यक्त केली.

वर्षानुवर्षे पाठपुरावा मात्र पदरी निराशा…

चिंचणी आणि बोरी ग्रामस्थांचा दोन्ही गावाच्या दरम्यान असलेल्या घोडनदी पात्रात पुल व्हावा. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासुन स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्याकडे पाठपुरावा चालु आहे. परंतु आश्वासनांच्या पलीकडे त्यांच्या पदरात काहीच पडलेलं नाही. निवडणुका आल्यावर शिरुर आणि श्रोगोंदा तालुक्यातील स्थानिक लोकप्रतिनिधींनी वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केल्याचे सांगितले असले तरी, प्रत्यक्षात मात्र काहीही झालेले नाही. त्यामुळे ७५ वर्षांनंतरही दोन्ही गावच्या ग्रामस्थांच्या पदरात निराशाच आली आहे.

यावर्षी सगळ्यात जास्त त्रास…

यावर्षी मे महिन्यातच मुसळधार पावसामुळे घोड धरण तुडुंब भरले. त्यामुळे धरणाच्या दरवाज्यातुन नदीपात्रात पाणी सोडावे लागले. मे ते सप्टेंबर या पाच महिन्यात घोडनदीच्या वरच्या भागात सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे घोड धरणातुन सतत नदीपात्रात विसर्ग सोडला जात होता. त्यामुळे चिंचणी व बोरी गावच्या दरम्यान असलेल्या नदीपात्रात पाणी असल्यामुळे पावसाळ्यात दैनंदिन वाहतुक बंद झाल्याने दोन्ही गावांतील लोकांचा आरोग्यसेवा, शिक्षण आणि बाजारपेठेशी संपर्क तुटला. त्यामुळे यावर्षी दोन्ही गावातील ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला.

कोणाकोणाकडे केला पाठपुरावा…?

चिंचणी आणि बोरी गावातील ग्रामस्थांनी आत्तापर्यंत दिवंगत खासदार दिलीप गांधी, माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील, माजी आमदार अशोक पवार, बबनराव पाचपुते तसेच अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके, शिरुर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांच्याकडे या पुलाबाबत पाठपुरावा केला असुन खासदार निलेश लंके यांनी लवकरात लवकर या पुलासाठी निधी मंजूर करुन देवू असे आश्वासन दिले आहे. श्रीगोंदा तालुक्याचे आमदार विक्रम पाचपुते आणि शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांच्याकडेही या पुला संदर्भात पाठपुरावा करणार असल्याचे चिंचणीचे माजी उपसरपंच अनिल पवार, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष कैलास पवार, शशिकांत गव्हाणे, संदीप पवार ,संभाजी पवार यांनी सांगितले.

शिरुर तालुक्यात भरदिवसा बिबट्याचा हल्ला; साडेपाच वर्षाच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू

शिरुर; कारेगाव येथील यश इन चौक बनत चाललाय अवैध धंद्यांचा अड्डा…?

Video; शिरुर पोलिसांची धडाकेबाज कारवाई गावठी हातभट्टी तसेच देशी-विदेशी दारु उध्वस्त

शिरूर तालुका टीम

Recent Posts

राजकारणातील सुसंस्कृत, विकासाभिमुख नेतृत्व हरपले; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…

2 तास ago

भंडाऱ्याचा रंग पिवळा, पण मनसुबा काळा! खंडोबाच्या नावावर रसायनांचा बाजार

श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…

2 तास ago

मालवणी समितीच्या शिफारशींचे काय झाले? पुणे विषारी दारू प्रकरणावर सरकारला सचिन सावंत यांचा सवाल

मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…

2 तास ago

विधान परिषद निवडणुकीत पैशांचा वापर; सखोल चौकशीची मागणी – विजय वडेट्टीवार

नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…

3 तास ago

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले; एकनाथ शिंदे

महायुतीचे सहा उमेदवार बिनविरोध; विकासकामांवर जनतेची मोहर असल्याचा दावा ठाणे: ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार…

20 तास ago

सार्वजनिक ग्रंथालयांना LGMS प्रणालीवर वार्षिक अहवाल सादर करण्याचे निर्देश; चंद्रकांतदादा पाटील

मुंबई: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयाने राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालयांना सन २०२५-२६ या…

21 तास ago