Shirur Police Station

शिरूर तालुक्यात एका मित्राचा विहिरीत बुडून तर दुसऱ्याने घेतला गळफास…

क्राईम मुख्य बातम्या

शिरूर (तेजस फडके) : धुलिवंदनाचा सण साजरा केल्यानंतर विहिरीवर पोहायला गेलेल्या एका युवकाचा कठड्यावरून तोल जाऊन विहिरीत पडल्याने बुडून मृत्यू झाला; तर या घटनेचा धसका घेऊन त्याच्या एका घाबरलेल्या मित्राने घरी जाऊन गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली आहे. या दोन्ही घटनांबाबत शिरूर पोलिसांनी स्वतंत्रपणे अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

विहिरीत पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव विक्रम अशोक शिंदे (वय १८, रा. बाबूराव नगर, शिरूर) असे आहे. तर राहत्या खोलीतील सिलिंगच्या हुकाला दोरीने गळफास घेतलेल्या युवकाचे नाव विशाल नवनाथ शिंदे (वय २१, रा. बाबूराव नगर, शिरूर, मुळ रा. विसापूर (ता. श्रीगोंदा, जि. नगर) असे आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धूलिवंदन साजरी केल्यानंतर काही मुले पुणे-नगर रस्त्यालगत बोऱ्हाडे मळा येथील रिलायन्स पेट्रोल पंपाच्या मागे असलेल्या विहिरीवर पोहायला गेली होती. विक्रम शिंदे याला पोहता येत नव्हते. विहिरीच्या काठावर उभा असताना तोल जाऊन तो विहिरीत पडला व पोहता येत नसल्याने बुडू लागला. त्याच्यासोबतच्या मित्रांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, परंतु वेळेत कुणाची मदत न मिळाल्याने ते घाबरून घरी पळून गेले.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच विक्रम याच्या कुटुंबीयांनी बोऱ्हाडे मळा येथील विहिरीकडे धाव घेतली. विहिरी तुडूंब पाण्याने भरलेली असल्यामुळे शोध लागत नव्हता. त्यामुळे मोटारी लावून विहिरीतील पाणी उपसल्यानंतर दुपारी चार वाजण्याच्या सुमारास विहिरीच्या पायरीखाली विक्रम मृतावस्थेत आढळून आला.

दुसरीकडे सोमवारी दुपारी तीनच्या सुमारास विशाल शिंदे याने राहत्या खोलीत गळफास घेतला. विशाल हा चिंतामणी लॅब चालवत होता व मित्रांसमवेत बाबूराव नगर येथे राहण्यास होता. त्याचे चुलते गणेश शिंदे यांनी पोलिसांना या घटनेबाबत कळविले. दोन्ही घटनांबाबत स्वतंत्र नोंदी घेतल्या असल्याचे पोलिस निरीक्षक जोतीराम गुंजवटे यांनी सांगितले. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत.

शिरुर; चिमुकलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरल्याने कारचालकास एक वर्षाचा कारावास

धक्कादायक; फिर्यादीच निघाला खुनातील आरोपी, चुलत भावानेच केला भावाचा खुन…

शिरुरमध्ये वेश्याव्यवसायासाठी लॉज भाड्याने देणाऱ्या लॉज मालकांवर कारवाई कधी…?

शिरूर तालुक्यात सशस्त्र दरोडा! दरोडेखोरांच्या हल्ल्यात महिला ठार, तर…

शिरुर तालुक्यात गुटका, मटका आणि इतर अवैध व्यवसाय जोमात; पोलिस मात्र कोमात