मुख्य बातम्या

शिक्रापुरच्या त्या ‘दिप’ रतनचा खाकी वर्दीला काळीमा फासणारा लाजिरवाना पराक्रम…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) ‘सत्य’ हे ताकातल्या लोण्यासारखं असतं ते कितीही खाली ढकललं तरीही वर येतंच. या म्हणीप्रमाणे कोणत्याही गुन्ह्याला ‘कधी ना कधी’ वाचा फुटते. केलेल पाप हे कधीना कधी उघडकीला येतेच खुनाला फुटते. अशीच एक धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे .

 

एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी लपवण्याचा आणि सोडुन देण्याच्या प्रयत्न चक्क आर्थिक लोभापोटी तेथील पोलिस निरीक्षकांनीच केला असल्याचा प्रकार त्याच पोलिस स्टेशनमधील ‘खत्री’ नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असुन ही घटना उघडकीस येणाची शक्यता असल्याने ‘खुनाला कधी ना कधी वाचा फुटती या म्हणीचा सध्या सर्वसामान्य नागरिकांना प्रत्यय येत आहे.

 

या पोलिस निरीक्षकाच्या हद्दीत गोवा, गुटखा, जुगार मटका, व्येशा व्यवसाय, अवैध दारु-ताडी विक्री या अवैध धदयांनी मोठा उच्छाद मांडला असुन यातुन मोठी माया गोळा केली जात आहे. या खुनाच्या घटनेसंदर्भात शिरुरच्या उपविभागीय अधिकारी यांना पोलिस कर्मचारी ‘खत्री’ भेटल्यावर चौकशीत काय निष्पन्न झाले आहे हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

 

पोलिस निरीक्षकांच्या अनेक गोष्टी ‘संशयास्पद’…?

सदर प्रकरणाबाबत भांडाफोड करणाऱ्या शिक्रापुर पोलिस स्टेशनचे कर्मचारी ‘गजानन खत्री’ या पोलिस कर्मचाऱ्याला याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की मी याबाबत पुरावे सादर करुन पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक यांना भेटलो आहे. तसेच माझी इतर पोलीस स्टेशन येथे बदली करावी अशी विनंती केली आहे. याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन मला न्याय न मिळाल्यास याबाबत उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.

 

पुणे ग्रामीण पोलिस दलाची प्रतिमा मलीन…?  

सध्या बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र पोलिसांची प्रतिमा खराब झाली असुन शिक्रापुरच्या पोलिस निरीक्षकांच्या या ‘उद्योगामुळे’ पुणे ग्रामीण पोलिस दलात खळबळ उडाली आहे. मुंबई येथील वाजे प्रकरणाची यामुळे आठवण ताजी झाली आहे.

 

तसेच पोलिस स्टेशनच्या लॉगबुकबाबत काय भानगड आहे…? खरोखरचं पोलिस निरीक्षकांनी सिसीटिव्ही (CCTV) फुटेज डिलीट केले आहेत का…? तसेच चौकशीला एवढा उशीर का होतोय…? या गोष्टी लवकरच समोर येतील. पण आता याबाबत वरीष्ठ अधिकारी काय भुमिका घेतात. तसेच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री याकडे लक्ष देणार का…? याकडे शिरुर तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे लक्ष लागले आहे.

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

रामलिंग महिला उन्नतीच्या पाठपुराव्याला अखेर यश…शिरुरच्या सुलभ शौचालयाचा ठेका रद्द

शिरूरमध्ये वृद्ध महिलेच्या गळ्याला तलवार लावून लुटणाऱ्याला शिरूर पोलिसांनी केले जेरबंद

 

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

3 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

4 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

4 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

4 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

4 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

4 तास ago