शिरुर (प्रतिनिधी) शिरुर तालुक्याच्या पत्रकारितेच्या आणि डिजिटल माध्यमांच्या इतिहासात अभिमानाचा क्षण म्हणजे www.shirurtaluka.com या वेबसाईटचे १५ व्या वर्षात पदार्पण. माहिती, बातम्या आणि लोकहिताच्या प्रश्नांना वाचा फोडणारे हे व्यासपीठ गेली पंधरा वर्षे सातत्याने जनतेच्या सेवेत कार्यरत आहे.
२६ मे २०११ रोजी महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मुंबई येथील विधानभवनात या वेबसाईटचे प्रकाशन झाले. त्या क्षणापासून सुरु झालेला हा प्रवास आज १५ वर्षे पुर्ण करुन अधिक प्रभावीपणे पुढे जात आहे. हि केवळ वेबसाईट नाही, तर शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या भावना, प्रश्न आणि अपेक्षांना अभिव्यक्त करणारे प्रभावी माध्यम बनले आहे.
या १५ वर्षांच्या वाटचालीत वेबसाईटने अनेक सामाजिक, शैक्षणिक, विकासकामांशी संबंधित आणि जनहिताचे विषय मार्गी लावले. वेबसाईटच्या माध्यमातून अनेकांना मदतीचा हात पुढे करता आला. अनेक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमाने सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे www.shirurtaluka.com ही वेबसाईट शिरुर तालुक्यातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.
या वेबसाईटची मोठी वाचकसंख्या, तसेच सोशल मीडियावर असलेला प्रचंड प्रतिसाद आणि फॉलोअर्सची संख्या हीच तिच्या विश्वासार्हतेची आणि लोकप्रियतेची साक्ष आहे. शिरुर तालुक्यातील प्रत्येक गावागावांपर्यंत पोहोचणारे हे माध्यम आज तालुक्याच्या जनतेचा विश्वासू साथीदार बनले आहे.
या यशामागे वेबसाईटचे मुख्य संपादक संतोष धायबर, कार्यकारी संपादक संपत कारकुड, संपादक तेजस फडके आणि उपसंपादक किरण शेलार-पिंगळे तसेच अरुणकुमार मोटे, अर्जुन शेळके, अक्षय टेमगिरे, सुनिल जिते, ओंकार भोरडे, योगेश शेंडगे यांच्यासह सर्व पत्रकारांची अथक मेहनत, निष्ठा आणि पत्रकारितेप्रती असलेली बांधिलकी महत्त्वाची आहे. त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हे व्यासपीठ आज यशाच्या शिखरावर पोहोचले आहे.
www.shirurtaluka.com च्या १५ व्या वर्षपूर्ती निमित्त आमच्या सर्व वाचकांचे मनःपुर्वक अभिनंदन यापुढील वाटचालही अशीच यशस्वी, लोकाभिमुख आणि प्रेरणादायी राहिल याची आम्हाला खात्री आहे. १५ व्या वर्षपूर्ती निमित्त लवकर एका दिमाखदार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील कारेगाव येथील हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या पृथ्वी ऊर्फ भैय्या…
शिरुर (तेजस फडके) सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी असलेल्या शिरुर तहसील कार्यालयातील कारभारावरच आता…
पांडव: तांदळी (ता. जि. वाशिम) येथे दुष्काळाची पाहणी करताना एका युवा शेतकऱ्याच्या भावनांचा बांध फुटला. डोळ्यांत…
माळेगाव कारखान्याच्या ७० व्या गळीत हंगामाचा शुभारंभ; ऊसदर, पाणी व्यवस्थापन आणि कामगारांच्या योगदानावर भर बारामती:…
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, संपूर्ण कर्जमाफी आणि वीजबिल माफी देण्याची मागणी मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त…
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना; २०२६-२७ पासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करणार मुंबई: राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील…